रमाबाई नगरमध्ये माथेफिरूचे घरांच्या छतांवर धुमशान

man on rooftopयआयटी परिसरातील रमाबाईनगर भागात गुरुवारी (आज) पहाटे घराच्या छतांवर चढून, नशेत असणाऱ्या एका माथेफिरूने घरांचे पत्रे फोडत धुमशान घातले. काय घडले आहे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या लोकांना त्याने यावेळी दगडे ही मारली. पवई पोलिसांच्या आगमनानंतर जवळपास तासाभरानंतर त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले. येथून जवळच असणाऱ्या मारुती नगरमध्ये राहणारा एक तरुण नशेत हे सर्व कृत्ये करत होता, ज्याला पवई पोलिसांनी ताब्यात घेतले.

रमाबाईनगर परिसरात रात्री ४ वाजण्याच्या सुमारास घराच्या पत्र्यावरून कोणीतरी फिरत असल्याचे अनेक स्थानिकांना जाणवले. मात्र, अनेकवेळा कुत्री घरांच्या पत्र्यावर चढून धावपळ करत असल्याने स्थानिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी काही लोकांचे घरांचे पत्रेही फुटल्याने घरांच्या पत्र्यांवर नक्की काय आहे? हे पाहण्यासाठी बाहेर निघालेल्या लोकांवर अचानक दगडाचा मारा सुरु झाला, तेव्हा लोकांच्या लक्षात आले कि कोणीतरी माथेफिरू घरांवर चढून हा सगळा धुमशान घालत आहे.

पत्र्यांवर असणारा तो इसम प्रवीण देठे (बदललेले नाव) असल्याचे स्थानिकांनी ओळखल्यावर त्याला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, त्याने ‘मी उडी मारून जीव देईन’ असा इशारा दिल्याने अखेर पवई पोलिसांना खबर देण्यात आली. त्याचा भाऊ सन्नी याने तेथे येऊन आपल्या भावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यावर तास-दिड तासाच्या धिंगाण्यानंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले.

पवई पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले असून, नशेत त्याने हा सगळा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!