नियम धाब्यावर बसवत पवई तलावात मासेमारी

@सिद्धार्थ शिरसट

crock and fishingवई तलावात मासेमारीस निर्बंध आहेत. तलावातील मगरी बाहेर आल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. जे पाहता तलावात मगरी आहेत, मगरींपासून सावधान, पाण्यात उतरू नका असे फलक पालिका आणि वन विभागातर्फे लावण्यात आलेले आहेत. मात्र, नियम धाब्यावर बसवत पवई तलावात सर्रासपणे मासेमारी केली जाते आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने, येथे जर एखादा अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल प्राणिमित्र संघटनेकडून केला जात आहे.

पवई तलावाच्या सौन्दर्यीकरणामुळे हा तलाव मुंबईकरांचे हक्काचे पर्यटन स्थळ बनला आहे. तलाव भागात नेहमीच मुंबईकरांची गर्दी पहावयास मिळते. आसपासच्या परिसरात राहणारे काही हौशी लोक येथे मच्छीमारीसाठी सुद्धा येत असतात. शनिवारी – रविवारी तर मोठ्या प्रमाणात लोक मासेमारीसाठी आलेले पहायला मिळतात. तलाव किनाऱ्याच्या कठड्या लगत असणाऱ्या भागात उतरून किंवा टायरच्या मदतीने तलावात उतरूनही मासेमारी केली जाते. मात्र पवई तलावात मगरी असल्याने मासेमारी करणाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. जे पाहता तलावात किंवा तलाव भागात उतरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीचे फलकही तलाव परिसरात ठिकठिकाणी पालिका आणि वन विभागातर्फ लावण्यात आले आहेत. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवत येथे बेधडकपणे मासेमारी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळेस तलावातून एक मगर, गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रुकसाठी बनवलेल्या मार्गाने बाहेर आली होती. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला असला तरी, जीविताला असणारा धोका कमी झालेला नाही. तलावात मासेमारीसाठी उतरलेल्या अनेक लोकांवर मगरीने हल्ले केले आहेत. यात लोक जखमी तर झालेच आहेतच, विजय भुरे नामक तरुणाला आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

नियम धाब्यावर बसवत मासेमारी केली जात असल्याने, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने या मच्छिमारांवर कारवाई करावी. अन्यथा येथे जर एखादा अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्राणिमित्र संघटनेकडून केला जात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!