महिलेवर सामुहिक बलात्कार

rapeआंबोली भागात भाड्याने घर पाहण्यासाठी गेलेल्या पवईतील २८ वर्षीय महिलेवर ८ तरुणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत पोलिसांनी आठ ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नस्तेन जाफर अली शेख उर्फ बाबू बंगाली (१९), नागेश धनगर (१९), इमरान शेख (२३), मोहमद गुलाम हुसेन खान (२३), राकेश खेरे (२१), झहीर शरीफ खान (२३), इजाज अहमद शेख (२३) आणि प्रदीप घाघर (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पवईत राहणारे जोडपे सोमवारी संध्याकाळी भाड्याने घर पाहण्यासाठी आंबोली परिसरातील श्यामनगर परिसरात गेले होते. त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने तेथील टेकडीवर असणाऱ्या अनेक झोपड्या दाखवता दाखवता वेळ झाल्याने रात्री तिच्याच घरी थांबण्याची विनंती करून ती खाजगी रुग्णालयात रात्रपाळी कामासाठी निघून गेली.

रात्री उशिरा घरात चालू असणारी लाईट आणि घराच्या मालकिणीला बाहेर जाताना पाहून स्थानिक भागात  राहणाऱ्या ८ तरुणांनी (यातील बरेच हे नशेखोर आहेत) घरात जबरदस्ती प्रवेश केला. काही तरुणांनी नवऱ्याला मारहाण करत घरातून बाहेर दूर नेले. तर, काही तरुणांनी घरात असणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. काही वेळाने उरलेल्या इतर तरुणांनी सुद्धा येऊन महिलेवर बलात्कार करून निघून गेले.

“या संदर्भात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद होताच आम्ही आठही आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीवर पूर्वी सुद्धा गुन्हे दाखल असून, पोलीस अधिक तपास करत आहेत” असे माध्यमांशी बोलताना पोलीस उप-आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.

आठ ही आरोपींना भादवि कलम ३७६ (ड), ३४१, ४५२, ५०६ (२), ५०४, ३२३, ३४ सह अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!