मोदी सरकारच्या काळात जिवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज संध्याकाळी ५ वाजता विक्रोळी स्टेशन येथे जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजीपाल्यासह गॅसचे व पेट्रोलच्या वाढीव दरामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समर्थक आज रस्त्यावर उतरले होते.
गेल्या आठवड्यात एलिफिस्टन रोड येथे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या घटनेतील बळींना यावेळी श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विक्रोळी तालुका आध्यक्ष कैलास कुशेर यांनी केले होते.
No comments yet.