हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत फोडला गेला होता. आता त्याला एक महिना उलटून गेल्यानंतर काम सुरु झाले नसल्याने “नारळ फुटला, आता कामाची सुरुवात कधी?” असा सवाल येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून आणि पवईकरांकडून विचारला जात आहे.
जवळपास गेली १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी –विक्रोळी लिंक रोडला नवसंजीवनी मिळणार असून, हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडसाठी विधान परिषद सदस्य आमदार आर. एन. सिंह यांच्या प्रयत्नातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १० लाख रुपयांचा फंड दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आला आहे.
१३ नोव्हेंबरला अनेक मान्यवर आणि पवईकरांच्या उपस्थितीत या रोडच्या कामाचा नारळ फोडून काम सुरु करण्यास हिरवा कंदील दिला गेला होता. मात्र, याला जवळपास एक महिना उलटून गेल्यानंतरही या कामाची कोणत्याही प्रकारची तयारी पहायला मिळत नाही आहे. शिवाय हे काम कधी सुरु होणार आणि कधी संपवणार याचे फलक सुद्धा रस्त्याजवळील भागात अजून पर्यंत लावण्यात आलेले नाहीत. मात्र याच्या उद्घाटनाचे आणि फंड मंजुरीचे बंनेर्स संपूर्ण पवईभर लावण्यात आल्याने आमदार आर. एन. सिंग यांचा सुद्धा हा नुसता पब्लिसिटी प्लान तर नाही ना? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
येथील काही प्रवाशांनी आणि स्थानिकांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘आमदार नसीम खान यांनी सुद्धा येथे अनेकवेळा भेटी देवून नारळ फोडून काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काम कधी झालेच नाही. पुढे स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा आणि हारून खान यांनी सुद्धा रोड निर्मितीच्या कामाचे बोर्ड लावून प्रसिद्धी मिळवली. कामाच्या नावाने तात्पुरते खड्डे भरण्या व्यतिरिक्त काहीच केले नाही. आता आर. एन. सिंग सुद्धा असेच काहीसे करताना दिसत आहेत. कामाच्या मंजुरीचे पोस्टर लावण्या व्यतिरिक्त रोडच्या कामाची कोणतीच हालचाल पहायला मिळत नाही आहे. म्हणजे हा सुद्धा आम्ही प्रसिद्धी मिळवण्याचा फंडाच समजायचे का?’
‘म्हाडा इंजिनिअर्सची टिम येवून जागेची पाहणी करून गेली आहे. प्रफुल मोरे यांना म्हाडातर्फे या कामासाठी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून काही तांत्रिक कारणामुळे कोणत्याही कामाची वर्क ओर्डर निघालेल्या नाहीत. येत्या आठवड्यात त्या मिळण्याची शक्यता आहे. ते मिळताच आम्ही कामाची सुरुवात करू’, असे या संदर्भात बोलताना आमदार आर. एन. सिंग यांच्या ऑफिसमधून सांगण्यात आले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
Hiranandani, hiranandani-ghatkopar link road, hiranandani-vikhroli link road, kailash complex road, Powai, kab tak banega. yeh return main likhkar do road main 6 sal se aaj tak sirf ghoshnabaji hoti hain. ROAD BANNE KE BAAD BANNER LAGAO.