ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोघांना १ कोटीच्या ड्रग्ससह साकीनाका येथून अटक

आरोपींच्या चौकशीत पोलिसांना दोघेही महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या तस्करी करणार्‍या टोळीचा भाग असल्याचे समोर आले आहे

दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने बुधवारी साकीनाका येथे मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार १.१० कोटी रुपये किमतीचे २.७५ किलोग्रॅमचे मेफेड्रॉन जप्त केले आहे.

साकीनाका येथील ९० फिट रोडवर वाहिद अली कंपाऊंडमध्ये अंमलीपदार्थ घेवून काहीजण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह या भागात सापळा रचला होता. येथे आलेल्या दोन तरुणांची संशयित हालचाल पाहून, त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे मेफेड्रॉन नामक अंमली पदार्थ मिळून आला. त्यांच्या चौकशी दरम्यान पोलिसांना कळले की ते दोघेही महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या तस्करी करणार्‍या टोळीचा भाग आहेत.

नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) अधिनियम, १९८५च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!