हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडच्या कामाचा भूमिपूजनाचा नारळ आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत फोडला गेला होता. आता त्याला एक महिना उलटून गेल्यानंतर काम सुरु झाले नसल्याने “नारळ फुटला, आता कामाची सुरुवात कधी?” असा सवाल येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून आणि पवईकरांकडून विचारला जात आहे. जवळपास गेली १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी […]
Author Archive | आवर्तन पवई
पवई तलाव वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची पवईकरांशी चर्चा
पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या घाण पाण्यामुळे पवई तलावाचे होणारे प्रदूषण तसेच त्याच्या सुशोभिकरणावेळी घ्यावयाच्या उपाययोजना आणि नियोजनबद्द कामावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या हायड्रोलिक विभागाच्यावतीने त्यांच्या भांडूप येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पॉज मुंबई संस्थेचे सुनिश सुब्रमण्यम, निशा कुंजू, यंग इन्वायरमेंट संस्थेच्या ईलसी गेब्रील, आशा संस्थेचे पदाधिकारी आणि पवईकर उपस्थित होते. हायड्रोलिक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]
शिवसैनिकांनो झपाट्याने कामाला लागा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण भाजपाने मुंबई महापालिका जिंकण्याचा विडा उचलल्याने शिवसेना सर्वतोपरी दक्ष झाली आहे. भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनेक शाखांना गुरुवारी भेट देऊन शिवसैनिकांना झपाट्याने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई भेटी दरम्यान त्यांनी पवईतील शाखा क्रमांक १२२ मध्ये येथील शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी […]
साहित्य रसिकांसाठी साठ्ये महाविद्यालयात पुस्तकोत्सवाचे आयोजन
@संजय पाटील तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. जे पाहता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने ‘पुस्तोकोत्सवाचे’ आयोजन केले आहे. या पुस्तोकोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते होणार आहे. चित्रशताब्दी, जत्रा, बायोस्कोप, माध्यमगड अशा संकल्पना घेऊन गेल्या काही वर्षात माध्यम महोत्सव यशस्वीरित्या पार पडला आहे. […]
पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न
पवई इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव यावर्षी ७ व ८ नोव्हेंबरला डॉकयार्ड मैदान, कांजुरमार्ग आणि शाळेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी कर्नल एस के सुरी हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्नल सुरी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार आणि पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन आणि […]
पवईत पालिका एस विभागातर्फे रस्ते दुरुस्तीच्या कामांची सुरुवात
पावसाळ्यानंतर खराब झालेल्या, उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून लोकांना चांगल्या रस्त्यांची सोय करून देण्याच्या कामांची सुरुवात पालिका ‘एस’ विभागाकडून सुरु झाली असून, याचा शुभारंभ जलवायू आणि म्हाडा कॉम्प्लेक्सच्यामधून असणाऱ्या रोडच्या कामाच्या सुरुवातीने झाला आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाणार आहे. मुंबई आणि खराब रस्ते यांचे एक अतूट नाते आहे. पावसाळा आला की, मुंबईत ठिकठिकाणी पालिका […]
चांदिवलीत शिव ओम इमारतीमध्ये भीषण आग, २ जखमी, १ मृत
चांदिवली येथील शिव ओम इमारतीमध्ये आज संध्याकाळी ३.४० च्या दरम्यान भीषण आग लागली. इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील भारवानी यांच्या घरात शोर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत असून, भारवानी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती यात जखमी झाल्या आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दोन्ही जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नंदलाल भारवानी (६७), तरुण नंदलाल […]
पोलीस शिपायाने ५० फुटांचा डोंगर चढून वाचवला तरुणाचा जीव
५० फुट उंचीवर डोंगरावर चढून जीव देण्याच्या तयारीत असणाऱ्या नवाब मन्सुरी (३५) या तरुणाशी वाटाघाटी करत, कोणत्याही सुरक्षा साधना शिवाय तेवढा डोंगर चढून त्या तरुणाचे जीव वाचवण्याचे शौर्य साकीनाका पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या सुहास अशोक नेवसे यांनी केले आहे. बुधवारी संध्याकाळी साकीनाका पोलीस ठाण्याला मुख्य नियंत्रण कक्षातून संदेश मिळाला की, संघर्षनगरच्या बाजूला […]
साकीनाका मेट्रो ते चांदिवली बस सेवा सुरु
साकीनाका मेट्रो स्टेशनवर चांदिवली, पवई भागातून येणाऱ्या लोकांचा मोठा लोंढा पाहता सकाळी ऑफिसवेळेत आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत बेस्टतर्फे साकीनाका मेट्रो ते चांदिवली नवीन बस सेवेचा गुरुवार पासून शुभारंभ केला आहे. प्रत्येक १२ मिनिटांनी ही सेवा असणार आहे. साकिनाका मेट्रो स्थानकाजवळच असणाऱ्या बस स्थानकातून ही बस सुटणार असून, चांदिवलीच्या मुख्य स्थानकातून या बसेस निघतील. साकीनाका […]
पवई इंग्लिश हायस्कुलला ‘सायन्स क्यूज’ स्पर्धेत द्वितीय पारितोषिक
आयआयटी, पवई येथील पवई इंग्लिश हायस्कुलने पाठीमागील आठवड्यात वार्ड पातळीवरील झालेल्या ‘सायन्स क्यूज’ स्पर्धेत दुसरे स्थान पटकावत आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. छायाचित्रात मुख्याध्यापिका शेरली पिल्लाई सोबत स्पर्धक विद्यार्थी करण तांबोळी, साईमा कुरेशी आणि प्रमिला टिचर दिसत आहेत. आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
पवई तलाव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गुंडाळला; पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर पालिकेचा निर्णय
पवई तलावात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी छोटा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र हा प्रकल्प बसवण्याचा खर्च करण्याऐवजी, तलावात सांडपाणी सोडण्यात येवू नये अशी मागणी पॉज या पर्यावरणवादी संघटनेने लावून धरली होती. याबाबत आवर्तन पवईने पाठपुरावा केला होता. महानगर पालिकेने अखेर आपला हा निर्णय पाठीमागे घेत, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुसरे उपाय योजणार […]
अमेरिकन आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून फेसबुकवर महिलेला गंडा
तीन लोकांच्या टोळीतील एकाला पवई पोलिसांनी केली अटक एक ४८ वर्षीय महिलेशी फेसबुक या सोशलसाईटवर अमेरिकन आर्मीत अधिकारी आहे आणि अफगाणिस्तान येथे पोस्टिंग असल्याचे सांगून, मैत्री करून ३ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला दिल्ली येथून पवई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. रिचर्ड डेविड शेम्री (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, अधिक तपासासाठी त्याला पोलीस […]
२६ नोव्हेंबरला पवईत ‘संविधान गौरव रॅली’चे आयोजन
@रविराज शिंदे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द केले होते. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी याला ६७ वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधत पवईतील तरुणांकडून समता, बंधुता, न्याय देणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पवईत […]
सराईत गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या
साकिनाक, पवई पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद नावावर असणाऱ्या नासिर अली मोहंमद शेख (३१) याची काही अज्ञात व्यक्तींनी गौतमनगर पाईप लाईन येथे डोक्यात बॉटल फोडून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बुधवारी पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्याच्या हत्येच्या मागील लोकांचा शोध सुरु केला आहे. पवईतील […]
हिरानंदानी – विक्रोळी लिंक रोडचा ‘नारळ फुटला’
जवळपास १२ वर्ष दुरावस्थेत असणाऱ्या हिरानंदानी –विक्रोळी लिंक रोडला आता नवसंजीवनी मिळणार आहे. याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांच्या हस्ते आणि अनेक पवईकर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडसाठी विधान परिषद सदस्य आमदार आर. एन. सिंह यांच्या प्रयत्नातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १० लाख रुपयांचा फंड मंजूर करण्यात आला […]
हिरानंदानीतील बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश
हिरानंदानी सुप्रीम बिजनेस पार्कच्या पाठीमागील भागात गेली ३ वर्षे वास्तव्य करून असणारा आणि सुप्रीम बिजनेस पार्कमध्ये कामासाठी येणाऱ्या अनेक लोकांना अधूनमधून दर्शन देणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वन अधिकाऱ्यांना यश आले आहे. पवईत ऑक्टोबर २०१३ ला पकडल्या गेलेल्या बिबट्यानंतर तीन वर्षात मुंबईत पकडला गेलेला हा पहिला बिबट्या आहे. गेल्या आठवड्यात बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी वन विभागाने […]
नोट बंदी’ समर्थनात पवईकरांची रॅली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या ‘नोट बंदी’च्या घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनात पवईतील नागरिकांनी आज (शनिवारी) संध्याकाळी एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत मोठ्या प्रमाणात समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी झाले होते. “मोदीजी काले धन के सर्जिकल स्ट्राईक मे हम आपके साथ हैं”, “काळे धन के खिलाफ आप का संघर्ष वंदनीय हैं”, […]
हिरानंदानी – विक्रोळी लिंक रोडसाठी दहा लाख मंजूर
हिरानंदानी–विक्रोळी रोडच्या निर्मितीसाठी आमदार आर. एन. सिंह (विपस) यांना महाराष्ट्र शासन नियोजन विभाग निधीतून १० लाखाचा फंड मंजूर गेली अनेक वर्ष श्रेयवाद, कोर्ट-कचेरी अशा अनेक फेऱ्यात अडकल्याने दुर्दशा झालेल्या हिरानंदानी–विक्रोळी लिंक रोडला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. आमदार आर. एन. सिंह (विपस) यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्या कार्यालयातून आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या […]
आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्या
आयआयटी कॅम्पस परिसरातून बरेच दिवस गायब झालेल्या बिबट्याचे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कॅम्पस परिसरात दर्शन घडू लागले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी असे अनेक लोकांना या बिबट्याने दर्शन दिले असून, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा हा बिबट्या फिरताना कैद झाला आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, बिबट्या नक्की कुठे लपून बसत आहे याची […]
पादचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थिनीने रंगवले पादचारी पूल
पादचारी पूल असून ही जीवावर उदार होत वाहतुकीतून रस्ता काढत जाणाऱ्या मुंबईकरांना पादचारी पुलाकडे आकर्षित करण्यासाठी, आयआयटी पवईत शिकणाऱ्या सलोनी मेहता या विद्यार्थिनीने सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १५ तास खर्ची घालून आयआयटी मेन गेट समोरील पादचारी पूल व परिसराची साफसफाई करून पायऱ्या व भिंती चित्रे काढून आणि रंगवून लोकांना या पादचारी पुलाचा वापर करण्यासाठी आकर्षित केले […]