२६ नोव्हेंबरला पवईत ‘संविधान गौरव रॅली’चे आयोजन

@रविराज शिंदे

constitution-day-of-indiaभारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांना सुपूर्द केले होते. २६ नोव्हेंबर २०१६ रोजी याला ६७ वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवसाचे औचित्य साधत पवईतील तरुणांकडून समता, बंधुता, न्याय देणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१६ रोजी पवईत ‘संविधान गौरव रॅली’चे आयोजन केले आहे.

सकाळी ८ वाजता पवईतील महात्मा फुलेनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात होईल. पुढे मोरारजीनगर, गरीबनगर, इंदिरानगर, गौतमनगर, हरिओमनगर, तिरंदाज व्हिलेज, गोखलेनगर, दत्ता सामंत बंगला, चैतन्यनगर मार्गे निघून माता रमाबाई आंबेडकर नगर येथे रॅलीची सांगता करण्यात येईल.

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या पालिका निवडणुकांना पाहता सर्वच राजकीय पक्ष आप-आपले खाजगी राजकारण करण्यात गुंतलेले असतानाच, आंबेडकरी विचारांचे सर्व पक्ष आणि तरुण या संविधान गौरव रॅलीसाठी संघटित झाले आहेत.

या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे, यावेळी तरुणांच्या हाती कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार असून केवळ तिरंगा असेल. या संविधान गौरव रॅलीत तमाम पवईकरांनी उपस्थित राहावे, असे आव्हान आयोजक तरुणांकडून करण्यात आले आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!