साकीनाका मेट्रो ते चांदिवली बस सेवा सुरु

asdसाकीनाका मेट्रो स्टेशनवर चांदिवली, पवई भागातून येणाऱ्या लोकांचा मोठा लोंढा पाहता सकाळी ऑफिसवेळेत आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत बेस्टतर्फे साकीनाका मेट्रो ते चांदिवली नवीन बस सेवेचा गुरुवार पासून शुभारंभ केला आहे. प्रत्येक १२ मिनिटांनी ही सेवा असणार आहे. साकिनाका मेट्रो स्थानकाजवळच असणाऱ्या बस स्थानकातून ही बस सुटणार असून, चांदिवलीच्या मुख्य स्थानकातून या बसेस निघतील.

साकीनाका येथून सकाळी ८.३० ते ११.३० वा. पर्यंत या सेवेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. तर चांदिवली येथून सकाळी ८.४० ते ११.१० वा. पर्यंत ही सेवा असेल. संध्याकाळी साकीनाका येथून ४.५० ते ७.१५ वा. पर्यंत आणि चांदिवली येथून ५ ते ७.३० वा. पर्यंत ही सेवा असणार आहे.

“साकीनाका मेट्रो स्थानकातून आठवड्याला ७५,००० हून अधिक प्रवासी प्रवास करतात. मुंबईच्या वाहतूक कोंडीचा आणि गर्दीचा सामना करत ऑफिसला जाणाऱ्या आणि संध्याकाळी ऑफिसमधून परतणाऱ्या मेट्रो प्रवाशांना याचा जास्त फायदा होईल” असे याबाबत बोलताना मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , ,

One Response to साकीनाका मेट्रो ते चांदिवली बस सेवा सुरु

  1. madan yadav December 6, 2016 at 2:34 am #

    Sakinaka

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!