रमेश कांबळे | बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागांतर्गत किटकनाशक विभागात काम करणारे कोरोना वॉरियर दिलीप धोंडीराम माने यांचे ३ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
“पालिकेच्या किटकनाशक विभागात काम करणारे माने हे आपल्या कामाप्रती प्रामाणिक होते. सध्या एवढ्या मोठ्या कोरोना संकटाच्या काळात ते सतत लोकांच्या संपर्कात राहून आपले काम योग्य रीतीने पार पाडत या कोरोनाला हरवण्यासाठी लढत होते. मात्र ही लढाई लढता लढता ते आपल्या जीवनाची लढाई हरून बसले,” असे याबाबत बोलताना त्यांच्या सहकारी पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
माने यांच्या पश्चात पत्नी मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. “त्यांच्या कुटुंबिय व नातेवाईकांवर माने यांच्या जाण्याने जे दुःख कोसळले आहे त्यांच्या दुःखात भांडूप ‘एस्’ विभागातील मलेरिया कामगार व अधिकारी सहभागी आहेत, असेही यावेळी बोलताना त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
No comments yet.