हिरानंदानीत मोटर प्रशिक्षण केंद्राची कार पेटली

burning carमोटर ट्रेनिंग प्रशिक्षण कारला इंजिनमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता हिरानंदानीतील टेक्नॉलॉजी स्ट्रीटवर घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून, कारचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

“सिटी मोटर या मोटर प्रशिक्षण केंद्राची एक कार सकाळी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देत होती. कार टेक्नॉलॉजी स्ट्रीटजवळ येताच कारच्या इंजिन भागातून धूर निघू लागला व गाडीच्या पुढच्या भागाने पेट घेतला,” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

प्रत्यक्षदर्शिंच्या मते, ‘कारला आग लागली तेव्हा कारमध्ये प्रशिक्षणार्थी बसलेले होते. मात्र, प्रशिक्षकाने गाडी रोडच्या किनाऱ्याला घेत आग पकडण्यापूर्वीच सर्व प्रशिक्षणार्थीना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!