काही महिन्यांपूर्वीच बनवण्यात आलेल्या एस एम शेट्टी शाळेजवळील रोडवर सुरुवातीच्या पावसातच खड्डे पडल्याने रस्त्याची अगदी चाळण झाली होती. याबाबत ‘आवर्तन पवई’ने पालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता अखेर दुरुस्त करण्यात आला आहे. एसएम शेट्टी स्कूलमार्गे असणारा रोड हा चांदिवली आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. दररोज या मार्गावरून हजोरोंच्या […]
Archive | Avartan Powai Impact
हिरानंदानीत, हेरीटेज उद्यान परिसरात पोलीस पथक तैनात
हिरानंदानी, पवई परिसरात पाठीमागील आठवड्यात घडलेल्या दोन गंभीर घटनेनंतर हेरीटेज गार्डन, एवलोन परिसरात पुन्हा पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्तांच्या अखत्यारीतील विशेष पोलीस पथकाला या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. लवकरच या परिसरात नवीन बीट चौकी देखील बनवण्यात येणार असून, संपूर्ण पोलीस पथक येथे कार्यरत असणार आहे. पवईतील हिरानंदानी परिसरात महाविद्यालयीन मुलांचा रस्त्यांवर, खाण्याच्या […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागातील डेब्रिज उचलली
आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील […]
आवर्तन पवई दणका: देवीनगरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास; कचरा उचलला
पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या ‘आवर्तन पवई‘चा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. आयआयटी पवई येथील देवीनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याचा पडलेला ढिगारा आवर्तन पवईच्या बातमी आणि पाठपुराव्यानंतर अखेर कालपासून पालिकेने उचलायला सुरुवात केली आहे. लवकरच संपूर्ण साफसफाई करून औषध फवारणी सुद्धा या भागात पालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईचे […]
चैतन्यनगरमध्ये पाण्याच्या पाईप बदलण्याच्या, गटार सफाईच्या कामाला सुरुवात
मुंबईत उन्हाच्या झळा वाढू लागलेल्या असतानाच, आता काही महिन्यांवर पावसाला ऋतू येवून ठेपल्याने नगरसेवक निधीतून चैतन्यनगर भागात नवीन ४ इंची पाईपलाईन टाकण्याचे तसेच गटारात असणाऱ्या पाण्याच्या पाईप बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासोबतच गटार साफ करण्याचे काम सुद्धा सुरु झाले आहे. पावसाला सुरु झाला की गटारांची साफ सफाईचे काम करण्यात आले नसल्याने अनेक […]
वाहतूक कोंडीतून सुटका: हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटवर ‘नो पार्किंग’
@प्रमोद चव्हाण वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात पवई दुसऱ्या स्थानावर असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र आता यातील वाहतूक कोंडी या समस्येतून तरी हिरानंदानी लवकरच सुटणार आहे. येथील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटला “नो पार्किंग झोन”घोषित करण्यात आले आहे. तसे संदेश देणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले असून, […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पालिकेने ८ तासात दुरुस्त केला रामबागचा रस्ता
पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या आवर्तन पवईचा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. पवई रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारती समोर पेवरब्लॉक उखडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे आवर्तन पवईने ट्विट आणि फोनवरील तक्रारीच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर केवळ ८ तासाच्या आत पालिकेने रस्ता दुरुस्त करून घेतला आहे. पवईतील रामबाग येथील डी पी रोड नंबर ९ वर […]