पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांदिवली येथील १००० शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पखवाडा साजरा होत असताना भाजप मुंबईच्यावतीने चांदिवली येथील झोपडपट्टीतील १००० मुलांना शाळेच्या ड्रेसपासून ते वह्या, पेन्सिल पर्यंतच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. चांदिवली येथील सेठिया नगर हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.

ग्रँड मराठा फाऊंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात भाजपा मुंबई अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रांशू दीक्षित यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सेवा पखवाडा म्हणून भाजपा साजरा करत असून, त्याअंतर्गत झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या आदरणीय पंतप्रधानांचे ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे स्वप्न आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा देशातील सर्व तरुण शिक्षित असतील.

या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या मुंबई अध्यक्षा ममता दीक्षित, ठाकूर संतोष सिंह, वसीम खान, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे विश्वस्त यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!