जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिरानंदानीतील रस्ते होणार ‘वन वे’
हिरानंदानी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीला फोडण्यासाठी हिरानंदानी विकासकाने पाऊले उचलत, आकार अभिनव कन्सल्टंट माध्यमातून वाहतूक समस्येचा अभ्यास केला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे वाहतूक विभागाला याचा अहवाल सोपवला आहे. या अहवालानुसार हिरानंदानीतील काही रस्ते एकमार्गी (वन वे) करण्याचे सुचवले आहे. गेल्या काही महिन्यात हिरानंदानीत वाहतुकीच्या समस्येने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. दररोज वाढत जाणाऱ्या या […]
हिरानंदानीत पुन्हा बिबट्या
हिरानंदानीतील सुप्रीम बिसिनेस पार्क जवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्टोर रूममध्ये येथील कामगाराला गुरुवारी सकाळी बिबट्या आढळून आल्याने परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेली तीन वर्ष इथून काही अंतरावरील जंगलात वास्तव्य असणारा बिबट्या खाली उतरून आल्याने पवईकरांची चिंता वाढली आहे. गेल्या तीन वर्षापासून ठराविक कालावधीने हिरानंदानी येथे असणाऱ्या टेकडीवरील जंगल भागात लोकांना बिबट्याचे दर्शन […]
पवईत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
एका १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ५ वाजता पवईतील महात्मा फुलेनगरात घडली. पूजा सिद्धार्थ भदरगे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव असून, ती कॉम्पुटर शिक्षण घेत होती. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. पूजा ही आपल्या आईवडील व भावंडांसोबत पवईतील फुलेनगरमध्ये राहते. सोमवारी दुपारी […]
साकीनाका येथे मेट्रो समोर तरुणाची आत्महत्या
बिहार येथील एका २५ वर्षीय तरुणाने साकीनाका मेट्रो स्थानकात मेट्रोसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मेट्रोच्या समोर आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे सेवा बराचकाळ विस्कळीत झाली होती. मात्र, काही तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली. बिहारच्या मधुबनी येथील उदय कुमार मिश्रा (२५) हा सकाळी ९.२० वाजता घाटकोपरकडे जाणारी […]
आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा
भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे. […]
गणेश विसर्जन २०१६ (अकरा दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप)
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
महेश गौडाच्या न्यायासाठी स्थानिकांचा मूक कॅंडल मार्च
विसर्जन काळात जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या महेशच्या मृत्यूस सुरक्षाव्यवस्था आणि विसर्जन व्यवस्था जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी घेऊन मंगळवारी रात्री पवईतील नागरिकांनी पवई प्लाझा ते गणेशनगर गणेश विसर्जन घाट असा मूक कॅंडल मार्च काढला. बुधवारी प्रतिनिधींनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आपली मागणी ठेवली. रविवारी गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या महेश […]
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा भाग ३
श्री गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पवईचा इच्छापूर्ती स्टार मित्र मंडळ युथ कॉंग्रेसचा राजा
पवई तलावात बुडालेल्या तरुणास गणेश विसर्जनास बंदी केल्याचा समाजसेवी संस्थेचा दावा
पवई तलावात विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण पवईवर शोककळा पसरलेली असतानाच, गणेश विसर्जनाचे काम पाहणाऱ्या ‘पवई नागरिक सेवा संस्था’ या समाजसेवी संस्थेने महेश यास पोहता येत नसल्याने विसर्जनाच्या कामास मनाई केली होती असा दावा केला आहे. या घटनेने सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न गणेश विसर्जनाच्या कामकाजावर उपस्थित झाला असून, याची नक्की जबाबदारी कोणाची? […]
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू
गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेल्या तरुणाचा पवई तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (रविवारी) पवईत घडली. महेश गौड (२४) असे या तरुणाचे नाव असून, तो स्वतः लाइफ गार्ड म्हणून विसर्जन काळात काम पाहतो. रविवारी सात दिवसाच्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशांचे विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर सुरु होते. अशाच एका सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती रात्री ११.५० […]
पवई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा भाग २
कला विकास मंडळ, तिरंदाज पवई बाल मित्र मंडळ, सैगलवाडी पवई पवई विकास मंडळ, पवईचा महाराजा, आयआयटी पवई किंगस्टार मित्र मंडळ, पवई नवसृष्टी युवा मंडळ, चैतन्यनगर पवई
दिड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
ढोल – ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला…. या जयघोषात मंगळवारी दिड-दिवसाच्या गणरायाला पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणेश भक्तांनी विसर्जन करून निरोप दिला. मुंबईमध्ये गणपती बसवणार्यांमध्ये दिड दिवसाच्या गणपतींचे प्रमाण अधिक असते. यंदाही अनेकांनी नवसपूर्ती व परंपरा पाळत गणरायाची चतुर्थीला प्रतिष्ठापणा केली आहे. मंगळवारी पवई, […]
लेक होममध्ये बाहेरील वाहनांना ‘प्रवेश बंद’
@pracha2005 लेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी येथील स्थानिकां व्यतिरिक्त बाहेरील वाहनांना आता कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबत तिन्ही कॉम्प्लेक्सच्या फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, १५ सप्टेंबर पासून यांची संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्या पूर्व सुचणेसाठी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी ‘Please leave our road alone’ […]
पवई किडनी रॅकेट: आरोपी रुग्ण ब्रिजकिशोर यांचे सुरतमध्ये निधन
खोट्या कागदपत्रांच्या आधारे किडनी मिळवणाऱ्या सुरत येथील व्यावसायिक व पवई किडनी रॅकेटमधील आरोपी ब्रिजकिशोर जैस्वाल यांचा सुरत येथे बुधवारी मृत्यू झाला आहे. जैस्वाल यांचे वकील यांनी याबाबत पवई पोलिसांना माहिती कळवली असून, पुढच्या सुनावणीच्या वेळी याबाबत कोर्टाला पवई पोलिसांकडून कळवले जाणार आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस सुरत येथील व्यावसायिकाची पत्नी दाखवून किडनी दिली जात […]
फुलेनगरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणाचा शुभारंभ
@रविराज शिंदे महात्मा फुलेनगरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नवरंग क्रीडा मंडळाच्या पाठपुराव्यामुळे अखेर याला चालना मिळाली असून, स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून गेल्या आठवड्यात पुतळा परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ करण्यात आला. येथील स्थानिक व रिपाइं मुंबई संघटक दिलीप हजारे यांच्या हस्ते १९९३ साली डॉ बाबासाहेब […]
नशेखोरांचा आयआयटी भागात हैदोस
इंदिरानगरच्या सार्वजनिक शौचालयाच्या छताला बनविला आपला अड्डा चरस, गांजा, दारू यांची नशा करून नशेखोरांनी आयआयटी भागात हैदोस घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत. इंदिरानगर येथील शौचालयावर तर चक्क काही नशेखोरांनी आपला अड्डा बनवला आहे. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी सह्यांची मोहीम राबवून युथ पॉवर संघटनेतर्फे पवई पोलिसांना लेखी पत्राद्वारे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. तुंगा येथील लहान […]
चाकूचा धाक दाखवून ६० हजाराची लूट
पवई तलाव भागात असलेल्या अंधाराचा फायदा घेत काही अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून, पतपेढीच्या वसुली प्रतिनिधीला मारहाण करून ६० हजाराची लूट केल्याची घटना काल (शुक्रवारी) रात्री पवई परिसरात घडली. याबाबत पवई पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. अमरनाथ गौड (४९), विक्रोळी परिसरात असणाऱ्या शुभम पतपेढीत वसुली प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. शुक्रवारी […]
हिरानंदानीत मोटर प्रशिक्षण केंद्राची कार पेटली
मोटर ट्रेनिंग प्रशिक्षण कारला इंजिनमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता हिरानंदानीतील टेक्नॉलॉजी स्ट्रीटवर घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून, कारचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. “सिटी मोटर या मोटर प्रशिक्षण केंद्राची एक कार सकाळी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देत होती. कार टेक्नॉलॉजी स्ट्रीटजवळ येताच कारच्या इंजिन भागातून धूर निघू […]
रमाबाई नगरमध्ये माथेफिरूचे घरांच्या छतांवर धुमशान
आयआयटी परिसरातील रमाबाईनगर भागात गुरुवारी (आज) पहाटे घराच्या छतांवर चढून, नशेत असणाऱ्या एका माथेफिरूने घरांचे पत्रे फोडत धुमशान घातले. काय घडले आहे पाहण्यासाठी घराबाहेर आलेल्या लोकांना त्याने यावेळी दगडे ही मारली. पवई पोलिसांच्या आगमनानंतर जवळपास तासाभरानंतर त्या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले. येथून जवळच असणाऱ्या मारुती नगरमध्ये राहणारा एक तरुण नशेत हे सर्व कृत्ये करत […]