पवई युवा प्रतिष्ठानच्यावतीने स्व. मा. चित्तरंजन शर्मा यांच्या स्मरणार्थ ‘पवई शिल्पकार चषक २०२१’ या दोन दिवसीय क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. पवई आयआयटी मेनगेट येथील सिनेमा ग्राऊंडमध्ये भरवण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये मुंबईभरातील अनेक संघ सहभागी झाले होते.
दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत बेस्ट ऑफ नाईन टिम यांनी प्रथम पारितोषिक २५,००० रूपये सहीत विजयचिन्ह पटकावलेे, तर दम इलेव्हन टिमने व्दितीय पारितोषिक १५००० रूपये सहीत विजयचिन्ह पटकावले.
या सर्व विजेत्यांचे पवई युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आण्णा नाडार आणि सचिव राकेश भालेराव यांनी विजयचिन्ह ‘पवई शिल्पकार चषक २०२१’ देऊन गौरव केला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक चंदन शर्मा उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद वानखेडे, नवीन कदम, रत्नेश सिंग, मेंहदी शेख, नितीन मोरे, राजू मोहिते, डेविड नाडार संदीप चव्हाण, सुरज निकाळजे यांनी अथक परिश्रम घेतले.
शनिवार २० नोव्हेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पवईत हिरानंदानी येथे अटल फुटबॉल चषकचे आयोजन करण्यात आले होते. नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पवईत खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघात झालेल्या या खेळाच्या स्पर्धेत ११ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत ब्रदर्स फुटबॉल क्लब…
https://youtu.be/ns0hvujhcAw वंचित बहुजन आघाडी वॉर्ड क्रमांक १२२ तर्फे रविवार, २१ नोव्हेंबर रोजी पवईमध्ये ‘संविधान चषक’ क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटी मेनगेट समोरील सिनेमा ग्राउंड मैदानात १२ संघांमध्ये हे सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांचे विशेष म्हणजे पवईमध्ये प्रथमच सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात असून, https://youtu.be/ns0hvujhcAw या लिंकवर क्लिक…
वादग्रस्त पवई सायकल ट्रॅक प्रकल्पाबाबत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांच्या गटांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे “सार्वजनिक सभे”बाबत तक्रार केली आहे. चहल यांना लिहिलेल्या पत्रात, रहिवाशांनी तक्रार केली आहे की ‘पवई तलावाचे पुनरुज्जीवन" या विषयावर २७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु केवळ काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आणि…
No comments yet.