पवईतील हरिओमनगर भागातून मुख्य वहिनीला जोडणाऱ्या मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाच्या मुहूर्ताचा नारळ आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते गुरुवारी (२५ ऑक्टोबर) फुटला. यावेळी स्थानिक नागरिकांसह शाखाप्रमुख (१२२) सचिन मदने, माजी शाखा प्रमुख निलेश साळुंखेसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत अजूनही काही परिसर असे आहेत जिथे लोकांना मूलभूत गरज मिळू शकलेल्या नाहीत. पवईसुद्धा त्यातील एक. एका बाजूला उंचच्या उंच इमारती आणि दुसरीकडे बैठ्या चाळी अशा दोन्ही संस्कृतींचे दर्शन घडवणारा हा परिसर. येथे अजूनही काही असे परिसर आहेत जिथपर्यंत मूलभूत सुविधाच पोहचू शकलेल्या नाहीत.
येथील डोंगराळ भागात असणाऱ्या वस्त्यांमध्ये अजूनही सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे, सार्वजनिक शौचालये, पाणी, रस्ते अशा सुविधा उपलब्ध नाहीत. जे पाहता शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या प्रयत्नातून आमदार फंडातून या भागात काही कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकीच एक हरिओमनगर येथून मुख्य वहिनीला जोडणारी मलनिःसारण वाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभाचा नारळ आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते फोडून कामाची सुरवात करण्यात आली.
‘आमदार फंडातून हे काम केले जात असून, पुढील महिनाभराच्या आता काम संपवले जाईल’ असे याबाबत बोलताना मदने यांनी सांगितले. सोबतच पवईतील अनेक भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार सुनिल राऊत