हिरानंदानी मधील वेन्चुरा इमारतीमध्ये असणारे प्रसिद्ध नाष्टा आणि मिठाई दुकान के ३ मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, मात्र तोपर्यंत संपूर्ण फर्निचर जळून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पवईकरांच्यात आपले हक्काचे नाष्ट्याचे ठिकाण नष्ट झाल्याची खंत व्यक्त होत आहे.
याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून के३चे सर्व कर्मचारी निघून गेले होते. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या आणि २४ तास चालणाऱ्या मेडिकलमधील कर्मचाऱ्याना या दुकानातून धूर आणि आगीच्या बारीक ठिणग्या निघत असताना दिसले. याबाबत त्यांनी लगेच दुकानाचे मालक, पोलीस आणि अग्निशमन दल यांना घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांच्या अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान आणि फर्निचर जळून खाक झाले होते.
शॉर्ट सर्किटमुळे ही लागली असल्याचा प्रथम दर्शनी समोर येत आहे.
हिरानंदानीमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आणि फिरायला येणाऱ्या लोकांसाठी के३ हे हक्काचे नाष्ट्याचे ठिकाण आहे. मात्र, मंगळवारी येथे येणाऱ्या लोकांना या घटनेमुळे धक्काच बसला असून, आपले हक्काचे नाष्ट्याचे ठिकाण नष्ट झाल्याची हळहळ अनेकजण व्यक्त करत होते.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.