चांदिवलीत शिव ओम इमारतीमध्ये भीषण आग, २ जखमी, १ मृत

shivom-fireचांदिवली येथील शिव ओम इमारतीमध्ये आज संध्याकाळी ३.४० च्या दरम्यान भीषण आग लागली. इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील भारवानी यांच्या घरात शोर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत असून, भारवानी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती यात जखमी झाल्या आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दोन्ही जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नंदलाल भारवानी (६७), तरुण नंदलाल भारवानी (३४) अशी जखमींची नावे आहेत. तर चेतना भारवानी (३८) ही यात मयत पावली आहे.

नंदलाल भारवानी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह चांदिवली नहार रोडवर असणाऱ्या शिव ओम या इमारतीच्या नवव्या मजल्यावर राहतात. दुपारी ३.४० च्या दरम्यान घरात टीव्हीचे कनेक्शन असलेल्या ठिकाणी शोर्ट सर्किट झाल्याने टीव्हीचा स्फोट झाला आणि घरातील फर्निचरने आग पकडली. भारवानी आणि त्यांची मुलगी हे अपंग असल्याने त्यांनी काही हालचाल करण्यापूर्वीच आगीने उग्र रूप धारण करत संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. आगीची माहिती समजताच सुरक्षारक्षक आणि कामगारांच्या मदतीने संपूर्ण इमारत खाली करण्यात आली.

“दुपारी मी माझ्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी बाहेर गेले होते, तर मुलगा बँकेत गेला होता. मी परत आले, तेव्हा घरात आग लागलेली होती. माझे पती आणि मुलगी दोघेही घराबाहेर पडू शकत नव्हते. कसेबसे माझ्या पतींनी घर उघडले आणि आम्ही घरात प्रवेश करून त्यांना बाहेर काढले. आग घरभर पसरलेली असल्याने आम्ही मुलीला बाहेर काढू शकलो नाही. घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाने येऊन तिला बाहेर काढले” असे पोलीस जबाबात श्रीमती भारवानी यांनी सांगितले.

मरोळ आणि विक्रोळी अग्निशमन दलाच्या ३ बंब, ४ टँकर व एक स्कायलिफ्टर्सच्या मदतीने अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

“आगीत भारवानी यांच्या घरातील नंदलाल भारवानी (स्वतः), तरुण भारवानी (मुलगा) हे जखमी झाले आहेत, तर मुलगी चेतना भारवानी हिचा मृत्य झाला आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!