चांदिवली, रहेजा विहार येथील हार्मोनी इमारतातीत आग लागल्याची घटना आज, बुधवार ९ नोव्हेंबरला घडली. संध्याकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत शोर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची घटना घडली. घटनेच्यावेळी घरात कोणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असून, आगीत घरातील सामानाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
इंजिनिअर असलेले दीपक कुमार तिवारी हे आपल्या पत्नीसह हर्मोनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत भाडेतत्वावर राहतात. बुधवारी त्यांची पत्नी कामानिमित्त परदेशी जात असल्याने तिला सोडण्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजता ते सहार एअरपोर्ट येथे गेले होते. यावेळी त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना फोन करून त्यांच्या घरातून धूर निघत असून, घरात आग लागल्याची माहिती दिली.
मी घरी पोहचलो तेव्हा अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली होती. घराच्या खिडकीत दिवाळीनिमित्त लायटिंग लावण्यात आली होती, त्यात शोर्टसर्किट झाल्याने आग लागली असण्याची शक्यता आहे. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात तिवारी यांनी म्हटले आहे.
“आगीत घरात किरकोळ नुकसान झाले आहे. खिडकीजवळ असणाऱ्या गादीवर ठिणगी पडल्याने त्याने पेट घेत घरात धूर पसरला होता” असे आवर्तन पवईशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद सुर्वे यांनी सांगितले.
घटनेवेळी घरात कोणीच नसल्याने सुदैवाने कोणत्याही जीवित हानीची नोंद झालेली नाही.
No comments yet.