१३ मार्च रोजी हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी, एमबीए (गॉड्स) फाउंडेशन आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरजू रुग्णांसाठी रक्ताची जाणवणारी तीव्र टंचाई असून, रक्तपेढ्यांमध्ये सुद्धा तुटवडा जाणवत आहे. ही गरज ओळखून हे रक्तदान शिबिर आयोजित केले गेले होते.
यावेळी हिरानंदानी हॉस्पिटलचे सीईओ डॉ. सुदीप चॅटर्जी, मीनाक्षी बालसुब्रमण्यम (अध्यक्ष एमबीए फाऊंडेशन), अखिल श्रीराम (ट्रस्टी एमबीए), अनिता सिंग (अध्यक्ष हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी), डॉ. लिन्सी जेकब (रक्तपेढी प्रमुख डॉ. एल एच हिरानंदानी रुग्णालय) आणि लेकर्स क्लबचे अध्यक्ष निमिष अग्रवाल हे उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात पवईकरांनी पुढाकार घेत यावेळी रक्तदान केले. मात्र या उपक्रमाचे विशेष ठरले ते म्हणजे महिलांनी केलेले रक्तदान. पुरुषांच्या प्रमाणातच महिला सुद्धा यावेळी रक्तदानासाठी पुढे आलेल्या पाहायला मिळाल्या.
कर्मचारी व रक्तदात्यांना मदत करण्यासाठी चंद्रभान शर्मा महाविद्यालय व सिंहगड महाविद्यालयातील स्वयंसेवक यांच्यासह सुरेश अग्रवाल, वीरेंद्र शर्मा, वंदना प्रभू, अश्विन प्रभू, मोहन अय्यंगार, के अनुपमा मोहन, रमेश देवरे यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
No comments yet.