जागतिक पर्यावरण दिन: अभ्युदय टीमने पवई तलावाची स्वच्छता करत काढला ३ टन कचरा

जगभरात आज ‘जागतिक पर्यावरण दिन’ (World Environment Day) साजरा होत आहे. पर्यावरण दिनानिमित्त अनेक जागरुक नागरिक एकत्रित येत आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबतात. अशीच एक स्वच्छता मोहीम आयआयटी बॉम्बेच्या अभ्युदय टीमने रविवार, ४ जूनला राबवली होती. या मोहिमेअंतर्गत त्यांनी पवई तलावाची साफसफाई करत ३ टन कचरा बाहेर काढला.

‘स्वच्छ पर्यावरण, हरित पर्यावरणा’चा संदेश देत, अभ्युदय टीमने पवई तलावात स्वच्छता मोहीम राबवली. पर्यावरण सप्ताह निमित्ताने अभ्युदय टीमच्या सुमारे चारशे स्वयंसेवकांनी दोन किमी लांबीच्या तलावाच्या परिसरात स्वच्छता करून तीन टन कचरा गोळा केला. अभ्युदय स्वयंसेवकांसोबतच स्थानिक रहिवासी आणि आयआयटी प्राध्यापकांनी देखील या स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन या उपक्रमाला पाठिंबा दिला होता.

‘आयआयटी मुंबईच्या सर्वात सुंदर परिसराचा भाग असणाऱ्या पवई तलावाची काळजी घेणे आमची जबाबदारी आहे,’ असे ‘टीम अभ्युदय’ने सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!