मागील दोन महिन्यांपासून आयआयटी पवई परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज देयके पाठविण्यात येत आहेत. टाळेबंदीमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये याबाबत संताप होता. याबाबत विभागातील काही नागरिकांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पवई शाखेशी संपर्क साधून सदर प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. पक्षाच्या पवई शाखेने २४ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भांडूप यांना निवेदन सादर केले आणि याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली.
“मागील दोन महिन्यांपासून आयआयटी पवई परिसरातील नागरिकांना अदानी इलेक्ट्रिसिटी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून प्रत्यक्ष मीटरचे रिडींग न करता अव्वाच्या सव्वा रकमेची वीज देयके पाठविण्यात येत आहेत. ही बिले त्वरित मागे घ्यावीत, मीटरचे रीडिंग करून मगच नागरिकांना बिले द्यावीत, नागरिकांना एकसाथ एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या वीजबिल भरणा करण्यासाठी मुदत द्यावी, हफ्त्या हफ्त्याने वीजबिल भरण्याची मुभा द्यावी” अशा मागणी यावेळी करण्यात आली असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
निवेदन सादर करताना मा.क.प. तालुका सचिव कॉ. आकाश बागुल मा.क.प. पवई शाखेचे सचिव कॉ. शैलेंद्र चौहान पक्षाच्या पूर्व उपनगर तालुका समिती सदस्या कॉ. संगीता सोनवणे. कॉ. तबरेज अली उपस्थित होते.
No comments yet.