आमदार दिलीप लांडे शिंदे गटात सामिल; संतप्त शिवसैनिकांनी पोस्टर फाडले, पोस्टरला काळे फासले

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच २३ जूनपर्यंत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगणारे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी शुक्रवारी सरळ गुवाहाटीत पोहचत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. दिलीप लांडे शिंदे गटात सामिल झाल्याचे समजताच शिवसैनिकांचा राग अनावर झाल्याने त्यांनी दिलीप लांडे यांचे पोस्टर फाडत आपला राग व्यक्त केला. तर काही शिवसैनिकांनी त्यांचे कार्यालय गाठत त्यांच्या पोस्टरला काळे फासले.

शिवसेनेचे नाराज आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी विविध कारणाने बंडखोरी करत ३७ आमदारांसह गुवाहाटी येथे आपला मुक्काम ठोकला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आल्याचे म्हटले जात आहे. समर्थनातील आमदारांची जुळवाजुळव सुरु असतानाच गुरुवारपर्यंत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहत मी इथे सुखी असल्याचे सांगणारे आमदार दिलीप लांडे यांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले.

ही बातमी समोर येताच स्थानिक शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. चांदिवलीतील माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे यांनी साकीनाका परिसरात लावलेले दिलीप लांडे यांचे पोस्टर फाडत आपला राग व्यक्त केला. तसेच काही शिवसैनिकांनी लांडे यांचे कार्यालय गाठत त्यांच्या पोस्टरला काळे फासले.

पुढे हा वणवा वाढतच गेला विविध भागात महिला शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पोस्टरला चपलांनी मारत आपला राग व्यक्त केला. अनेक शिवसैनिकांनी छत्रीवर असणाऱ्या फोटोला काळे फासले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नसून, त्यांना मुंबईत आल्यावर शिवसैनिकांच्या संतापाचा सामना करावाच लागणार आहे, असे मतही यावेळी काही युवासैनिकांनी व्यक्त केले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!