मेट्रो ६च्या १०८ डब्यांच्या खरेदीसाठी एमएमआरडीएने काढली निविदा; ९८९ कोटींचा खर्च

मेट्रो ही लाईन पूर्णपणे उन्नत असून, वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडते.

file photo

अंधेरीतील स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मेट्रो लाईन-६ मार्गावर धावणाऱ्या सहा डब्यांच्या मेट्रोचे डबे पुरविण्यासह त्यांची चाचणी करणे व मेट्रो चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा काढली आहे. ३१ जुलै २०२३ ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे.

एमएमआरडीएने एजन्सी शोधण्यासाठी एक निविदा जारी केली असून, पहिल्या टप्प्यात १०८ डबे खरेदी करणार आहे. सहा डब्यांनुसार एकूण १८ गाड्या मागविण्यात येत आहेत. यासाठी ९८९.८७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

एमएमआरडीएने एजन्सी शोधण्यासाठी एक निविदा जारी केली आहे. जी उन्नत मेट्रो लाईन ६वर या डब्यांची रचना, निर्मिती, पुरवठा, चाचणी करेल. या मेट्रो ट्रेनच्या संचालनासाठी प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी देखील एजन्सीची असेल.

या मेट्रो गाडीच्या सहा डब्यांची एकूण प्रवासी हाताळणी क्षमता २,२८० असेल. या मार्गिकेवरील फलाटांची लांबी तसेच रेल्वे रुळांपासून उंची ध्यानात घेत डब्यांची आखणी करावी, असे एमएमआरडीएने निविदेत म्हंटले आहे.

मुंबई मेट्रो ६ – स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या १२.३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम जोमात सुरु आहे. नुकत्याच या मार्गावर काम पूर्ण झालेल्या काही भागातील बेरीकॅडेस वाहतुकीच्या सुविधेसाठी हटवण्यात आले आहेत. १५.८ किमी लांबीच्या या मार्गिकेवर एकूण १३ स्थानके आहेत. ही मार्गिका पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगरांशी जोडणारी एक उन्नत मार्गिका आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

Comments are closed.

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d bloggers like this: