जोरदार पावसामुळे हिरानंदानीत झाडे उन्मळून पडली; दोन गाड्यांचे नुकसान

शुक्रवारी मुंबईमध्ये पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार हवा आणि पावसामुळे पवईतील हिरानंदानी गार्डन्स परिसरात दोन झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. रस्त्यावर ही झाडे पडल्याने दोन गाड्यांचे नुकसान झाले. तसेच जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

हिरानंदानी येथील क्लिफ एव्हेन्यू रोडवर लेक कॅसल इमारतीसमोर शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास कॅना इमारतीसमोर असणारी दोन झाडे उन्मळून लेक कॅसलच्या दिशेने रस्त्यावर पडल्याची घटना घडली. ही दोन्ही झाडे पडताना या मार्गावरून जाणाऱ्या एका रिक्षावर आणि पार्क केलेल्या एका कारवर पडल्याने दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने रिक्षाचालक  या घटनेत थोडक्यात बचावला.

रस्त्यावरच झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडी आणि बंद झालेल्या रस्ता पाहता संपूर्ण वाहतूक सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि ऑर्चीड एव्हेन्यू रोडवरून वळवण्यात आली होती.

मुंबई अग्निशमन दल आणि हिरानंदानी समूह उद्यान विभागाच्या मदतीने जवळपास तासाभराच्या मेहनतीनंतर रस्त्यावरील पडलेली झाडे बाजूला करण्यात यश आले. झाडे पडल्याच्या जवळपास ३ तासानंतर या मार्गावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!