पवईत ट्रक आणि कारचा भीषण अपघात; एक जखमी

पवईत जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) गांधीनगरजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवार, २९ जून दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून, कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०८ आर ८१३२ गांधीनगरकडून पवईच्या दिशेने जात होती. कार सनसिटी कॉम्प्लेक्सजवळील चढण चढत असताना अचानक कारचे ब्रेक निकामी झाले. ब्रेक निकामी झाल्याने कार उताराने पाठीमागे येत याच मार्गावरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमपी ०७ जीए ५६३७च्या पुढील भागाला धडकली.

“ट्रकच्या समोरील चाकाखाली कार आल्याने कारचा चक्काचूर करत ट्रक उलटला. सुदैवाने या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप असून, ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ विक्रोळी येथील आंबेडकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान ट्रक रस्त्यावरच उलटल्याने गांधीनगरवरून पवईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर जवळपास तासभर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माहिती मिळताच पार्कसाईट पोलीस आणि कांजुरमार्ग वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने उलटलेल्या ट्रकला बाजूला घेत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!