महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषेच्या मुद्यावरून सतत आवाज उठविला जात असतो. रविवारी सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा होत असतानाच पवईमध्ये विद्यार्थी सेनेतर्फे तर चांदिवलीमध्ये मनसे शाखेतर्फे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ मोहीम राबवत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विभाग अध्यक्ष प्रशांत परुळेकर, उपविभाग अध्यक्ष शैलेश वानखेडे, मनविसे शाखा अध्यक्ष महेश देडे, शाखा सचिव संदेश शिंदे, मनसैनिक दिपक गंगावणे, अनिल शिंदे उपस्थित होते.
मराठी भाषा दुर्लक्षित होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या मनसे कार्यकत्यांनी यावेळी नागरिकांना मराठीत सही करण्याची विनंती केली. नागरिकांनीही याला प्रतिसाद देत मराठीत सही करून त्यांच्या या मोहिमेला प्रतिसाद दिला.
“अनेक लोक हे इंग्रजीत स्वाक्षरी करण्यास प्राधान्य देत असतात मात्र किमान महाराष्ट्रातील लोकांनी तरी मराठी भाषा जपावी, तिचा अभिमान बाळगावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत,” असे यासंदर्भात बोलताना मनसे विद्यार्थी सेनेचे वॉर्ड १२५ अध्यक्ष महेश देडे म्हणाले.
No comments yet.