मुंबई काँग्रेस प्रभाग क्रमांक १२२च्या ‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा काळ लक्षात घेऊन सुमारे १०० गरजू दिव्यांगांना रेशन किट वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, पवई अशा अनेक भागातील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आणि मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या सेवेत सक्रिय सहभाग घेतला.
कोविड – १९ महामारीपासून देशाला काही काळ विश्रांती मिळाल्यानंतर पाठीमागील महिनाभरापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. ज्याला पाहता महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध लावले आहेत. याचीच दखल घेत ‘अन्नदान सर्वश्रेष्ठ दान’ उपक्रमांतर्गत मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. याच उपक्रमांतर्गत त्यांनी पवई आणि आसपासच्या परिसरात दिव्यांग व्यक्तींना रेशन किटचे वाटप करून मदतीचा हात दिला.
No comments yet.