मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ तर्फे त्यांच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आणि पवई परिसरात राहणाऱ्या बेघर आणि गरजूंना ३०० हून अधिक ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनने सर्वसामान्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मुंबईला विशेषत: याचा मोठा धक्का बसला आहे. कारण हे शहर मोठ्या संख्येने रोजंदारी करणाऱ्या मजुरांचे घर आहे. अनेकांनी आपल्या नोकऱ्या, निवारा आणि जीव गमावला आहे. अशा संकटाच्या काळात ज्यांनी छप्पर गमावले आहे त्यांच्यासाठी हिवाळा आव्हानात्मक ठरेल हे लक्षात घेत अशा आव्हानात्मक काळात गरजूंसाठी काहीतरी करण्याचे मुंबई काँग्रेस प्रभाग १२२ यांनी ठरवले होते.
यासंदर्भात बोलताना मुंबई काँग्रेस प्रभाग १२२चे अध्यक्ष प्रदीप वर्मा म्हणाले, “गरीब, बेघर आणि मुंबईतील दैनिक मजुरीवर जगणारे कामगार जगण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी खरोखरच कठोर परिश्रम करतात. मुंबईच्या या अविश्वसनीय पायाभूत सुविधांचा कणा म्हणून उभ्या असलेल्या या लोकांसाठी काम करण्याची नेहमीच आमची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही पाठीमागील अनेक वर्षांपासून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी काम करत आहोत. कोविड महामारीसोबत थंडीच्या काळात घरात असणाऱ्या नागरिकांची सुद्धा दैना झाली आहे. मग अशात रस्त्यांवर, उड्डाणपुलांखाली आसरा घेतलेल्या बेघर लोकांची काय अवस्था असेल! हे लक्षात घेत आम्ही या लोकांना ब्लँकेटचे वाटप केले.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही लोकांना विनंती करतो कि, गरजूंना आणि समाजाला शक्य ती छोटीशी मदत पुरवण्यासाठी आपला मदतीचा हात द्या. आम्ही नागरिकांच्या मदतीचा हा वसा सोडणार नसून, पुढील काळात सुद्धा समाजासाठी आणखी काही करण्यास उत्सुक आहोत.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.