पवई, हिरानंदानीत एनएसजीचे मॉकड्रील, मुंबईकरांची तारांबळ

एनएसजी कमांडो हिरानंदानीत मॉकड्रील करताना

पवईतील हिरानंदानी भागात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नेशनल सेक्युरिटी गार्ड (एनएसजी) कॅमांडोची मॉक ड्रील पार पडली. मात्र हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवरील डी मार्ट ते रोडस सर्कल भागातील संपूर्ण रस्ता अचानक बंद केल्याने आणि कमांडोजची पळापळ बघून नक्की काय घडलेय या भीतीने पवईकरांसोबतच येथे कामाला आलेल्या अनेक मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली.

आतंकवादी संघटनांनी मुंबईवर हल्ले करत देशाला कमकुवत करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येकवेळी मुंबई तितक्याच ताकदीने उभी राहिली आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर आणि मुंबईला सतत केल्या जाणाऱ्या टार्गेटच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या क्यूआरटी, फोर्सवन सह मुंबईत पवईजवळ एनएसजी कमांडोचा ५वा हब तयार करण्यात आला आहे.

या सर्व सुरक्षा संस्थाना परिसरातील परिस्थिती लक्षात घेत सराव करणे आवश्यक असते. यासाठी एनएसजी एक ठराविक अंतराने हिरानंदानी, आयआयटी आणि पवई भागात सराव म्हणजेच मॉक ड्रील करते. यासाठी मुंबई पोलीस आणि ज्या इमारतीत हे मॉकड्रील होणार आहे तेथील प्रशासनाला माहिती देत हे मॉकड्रील केले जाते. बुधवारी देखील असेच एक मॉकड्रील हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यूवर पार पडले. मात्र परिसरात अचानक कमांडोजच्या गाड्या आणि हातात शस्त्र घेवून इमारतीत कमांडो घुसताना पाहून या परिसरातील लोकांची घाबरगुंडीच उडाली.

“अनेक नागरिक आम्हाला फोन करून करून नक्की काय घडलेय. आतंकवादी घुसलेत का? काही धोका आहे का? असे प्रश्न विचारत होते. त्यांना नाही एनएसजीचा सराव सुरु असल्याचे सांगितल्यावर मात्र ते शांत होत होते,” असे यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले.

आधीच लोकांची तारांबळ उडालेली असताना या संपूर्ण मार्गावर वाहतूक रोखत ती इतर मार्गाने वळवल्याने नागरिक आणखीन भयभीत तर झाले होते शिवाय परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली होती. कामावरून सुटलेल्या, परिसरात फिरायला आलेल्या अनेक मुंबईकरांनी येथे नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी येथील चौकात, रस्त्यावर गर्दी केली होती. त्यामुळे त्या वाहतूक कोंडीत भर पडली होती.

“हे सराव आवश्यक आहे आणि आमच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. मात्र सराव जर इमारतीच्या आत केले जात असतील तर ते कार्यालये सुटायच्या किंवा गर्दीच्या वेळेतच करणे आवश्यक आहे का? सराव करण्यास प्रत्येकवेळी फक्त पवईच का? इतर भागात सराव होवू शकत नाही का? कि मुंबईत इतर भागाला धोका नाही फक्त पवईलाच धोका आहे त्यामुळे केवळ येथेच सराव केला जातो. असे एक न अनेक प्रश्न नागरिक आता उपस्थित करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!