साकीनाका येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


@आकाश शेलार वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि हॉस्पिटल मध्ये रुग्णांची झालेली वाढ, तसेच ब्लड बैंक मध्ये थैलीसीमिया प्रभावित गरीब आणि गरजू मुलांसाठी दर महिन्याला रक्ताची आवश्यकता असते. रक्ताची वाढती मागणी पाहता समर्पण ब्लड बँकेच्या मागणीनुसार तसेच गरजू व्यक्तींना मोफत रक्त मिळावे या उद्देशाने विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल कुर्ला उमा महेश्वर प्रखण्डच्या कार्यकर्त्यांतर्फे रविवारी सत्यानगर वाचनालय साकीनाका येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पाऊसाचा जोर तसेच कोरोनाचे संकट असताना सुद्धा लोकसेवेसाठी साकीनाका येथील लोकांनी रक्तदान करून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.

योग्य ती काळजी घेत सोशल डिस्टेनसिंग पाळून, सर्व रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत रक्तदान शिबीर व्यवस्थित पार पाडण्यात आले.

रक्तदान शिबिरात उपस्थित सर्व कार्यकर्ते, समर्पण ब्लड बँक आणि सर्व रक्तदात्यांचे या कोरोना काळात सुद्धा त्यांनी केलेल्या रक्तदानासाठी विहिप बजरंग दल कुर्ला जिल्हा उपाध्यक्ष मधुसूदन वेगल्लन यांनी विशेष आभार मानले.

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!