बुधवारपासूनच उत्तर मध्य महाराष्ट्रात गारवा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा नोंदवला गेला आहे. सर्वात कमी १.८ अंशाची नोंद निफाड तालुक्यात होत, दवबिंदू गोठले आहेत. मुंबईत सुद्धा पाठीमागील तीन वर्षांतील किमान म्हणजेच १२.४ तापमानाची नोंद झाली. यात सर्वाधिक गारठलेल्या ठिकांणीपैकी पवई एक असून, येथे १३ अंशाची नोंद झाली आहे.
दोन महिन्यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यातही पवई गारठली होती. त्यावेळी पवईत १९.०९ किमान तापमानाची नोंद झाली होती. ऐन उन्हाळ्यात होरपळून निघालेल्या पवईकरांना हिवाळा ऋतूच्या सुरवातीला थंडीने सुखावल्याने समाधान मिळाले होते.
बुधवारी मुंबईत पहाटे किमान १७.४ अंश तापमानाची नोंद झाली होती. ज्यात घसरण होत काही तासातच तापमान पाच अंशाने कमी झाले. यावेळी पश्चिम उपनगरातील पवई, कांदिवली, मालाड, गोरेगाव येथे पारा १३ अंशाच्या खाली उतरला होता.
महाराष्ट्रात इतर ठिकाणी पहाटेच्या वेळी जाणवणारा गारठा मुंबईमध्ये फारसा जाणवत नसला तरी बुधवारपासून मुंबईत सुद्धा सूर्य डोक्यावर येईपर्यंत वातावरणात चांगलाच गारवा जाणवत आहे. मुंबईकराला घामाघूम करणाऱ्या उन्हापासून पळ काढणारे मुंबईकर यावेळी मात्र मुंबईत पडलेल्या या गारव्याचा आनंद घेताना आढळून येत आहेत.
शुक्रवारी सकाळी किमान तापमानात थोडी वाढ झाली असली तरी सकाळचा गारठा कायम आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये किमान तापमानात अजून घट होणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
No comments yet.