मुंबईतील पवई तलावाची पाण्याची गुणवत्ता गेल्या काही वर्षांत प्रदूषणामुळे ऱ्हास झाली आहे. सांडपाण्या व्यतिरिक्त, घनकचरा विशेषत: प्लॅस्टिक, सांडपाणी पावसाच्या तलावामध्ये सोडले जाते. पवई तलाव भागात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या भागात टाकलेल्या कचऱ्यामुळे, तलाव पात्रात टाकलेल्या निर्माल्यामुळे या भागात कचऱ्याचे साम्राज्य वाढत जात असतानाच पवई तलावाला वाचवण्यासाठी अभुदय – आयआयटी पवई आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव भागात आज (०३ नोव्हेंबर) क्लीनअप ड्राइव्हचे आयोजन केले होते. या उपक्रमात ३०० हून अधिक स्वयंसेवकांनी मिळून १.५ टन कचरा साफ केला.
पवई तलावाच्या होणाऱ्या ऱ्हासाला रोखण्यासाठी ५ जून जागतिक पर्यावरण दिनी निसर्ग स्वास्थ्य संस्था, यंग एन्व्हायरोमेंट गृप, अभुदया – आयआयटी पवई, पवई तलाव ऑर्गनायजेशनच्या माध्यमातून मेगा क्लीनअप ड्राइव्ह आयोजित केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी सहभाग घेत २ टनापेक्षा जास्त कचरा साफ केला होता. याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून अभ्युदय आयआयटी बॉम्बे या संस्थेने पालिकेच्या संयुक्तीने आज रविवारी ३ नोव्हेंबरला पवई तलाव स्वच्छता व जागृती अभियानाची दुसरी पायरी रचली. स्वच्छ, हरित आणि निरोगी वातावरणाला चालना देण्यासाठी या मोहिमेचे उद्दीष्ट पवई तलावाच्या किनाऱ्यावर स्वच्छता करणे होते. ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी यात सहभाग घेत १ किमीच्या विस्तारात सुमारे १.५ मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला होता.
यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पवई तलावात जाणाऱ्या घन कचऱ्यावर एक विशिष्ट प्रक्रिया करून तलावात सोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि भविष्यात तलावाला सुशोभित करण्याच्या त्यांच्या इतर योजनांच्या बाबत माहिती दिली.
एवढ्यावरच न थांबता आपले निसर्गसौंदर्य वाचवण्यासाठी आणखी काही उपक्रम राबविण्याचा निर्धार सुद्धा यावेळी या संस्थेतर्फे करण्यात आला.
No comments yet.