कोरोना काळात पोलिसांना मदत करण्यासाठी पवई पोलिसांतर्फे ‘कोविड पोलीस’ नियुक्त

Covid Policeमुंबई पोलिसांवर कोरोना वाढीचा वेग आणि कामे पाहता मोठा तणाव आहे. या तणावाला कमी करण्यासाठी पवई पोलिसांनी एक पर्याय निवडला असून, ‘कोविड पोलिस’ (Covid Police) हा स्वयंसेवक उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये स्थानिक तरुणांना या कोरोना काळात परिसरात नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केले गेले आहे. यामुळे पोलीस खात्यातील मनुष्यबळावर असणारा ताण कमी होतानाच समाजातील होतकरू आणि समाजसेवेसाठी इच्छुक तरुणांना पुढे येता येत आहे.

‘आवर्तन पवई’शी बोलताना साकीनाका पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) मिलिंद खेतले म्हणाले, “कोविड पोलिस (Covid Police) हा एक स्वयंसेवी उपक्रम असून, पवई आणि साकीनाका येथील नागरिकांना पुढे येण्याची आणि धाडसी लोकांना मदत करण्याची संधी दिली जाते.”

पवई पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोविड पोलिस’ (Covid Police) स्वयंसेवकांची प्रमुख भूमिका आणि जबाबदाऱ्या म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्ये शिस्त व सोशल डिस्टन्सिंग राखणे. या झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना अन्नधान्य, राशन आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत पुरवणे. महामारी दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधत त्यांना सहकार्य करणे.

‘कोविड पोलिस’ (Covid Police) स्वयंसेवकांच्या पहिल्या तुकडीने केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वपोनि) सुधाकर कांबळे यांनी सांगितले की “स्वयंसेवक अत्यंत प्रेरित आहेत आणि समाज आणि मानवतेसाठी निःस्वार्थ सेवा देत आहेत.”

इनपुट: गौरव शर्मा

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामट्विटरयूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to कोरोना काळात पोलिसांना मदत करण्यासाठी पवई पोलिसांतर्फे ‘कोविड पोलीस’ नियुक्त

  1. Pradnya ghaytadke June 8, 2020 at 6:36 pm #

    Sir I am ready to help u for all the purpose u needed

Trackbacks/Pingbacks

  1. पवईत कोरोनायोद्धा प्रमानपत्रांचे पेव » बातमी » आवर्तन पवई - June 9, 2020

    […] हे सुद्धा वाचा: कोरोना काळात पोलिसांना मदत करण्यासाठ… […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!