पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवार, ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी सकाळी अयोध्येत पोहोचले होते. यावेळी पंतप्रधानांसह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. याचा आनंद पवईतही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीप प्रज्वलन करून आणि लाडू वाटून पवईकरांनी हा आनंद साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थिताना संबोधीत केले. आज इतिहास रचला जात आहे असे उदगार काढतानाच शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. येथे आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असे यावेळी बोलताना ते म्हणाले. मंदिर भूमीपूजनाचा आनंद देशभर साजरा होत असून, पवईतही नागरिकांनी याचा आनंद साजरा केला.
गणेशनगर (पंचकुटीर) येथील श्री दुर्वप्रिया गणेश मंदिर येथे श्री राम लिहलेल्या आकारात दिवे लावत आनंद साजरा करण्यात आला. तर माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार मित्र मंडळाच्यावतीने हरिओमनगर येथील शिव मंदिर, आयाप्पा मंदिर, हनुमान मंदिर आणि गुरुद्वारा भागात ५,५५५ दीप प्रज्वलित करून आणि सर्व नागरिकांना लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.
No comments yet.