सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन

सचिन तेंडुलकरच्या हस्ते सेव्हन हिल रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटनक्रिकेट आयकॉन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी मरोळ येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपी युनिटचे उद्घाटन केले. प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्यानेच राज्य सरकारने या थेरपीला परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या पुढाकाराने प्लाझ्मा थेरपी युनिट कोरोनाव्हायरसच्या लढाईत एक नवीन आघाडी उघडत आहे.

“कोविड -१९च्या साथीच्या रूपाने अभूतपूर्व आव्हान उभे आहे. या प्रसंगी आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, पालिका आणि सरकारी कर्मचारी हे सर्वच प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत” असे यावेळी बोलताना सचिन यांनी सांगितले.

कोरोना विषाणूवर अध्यापही कोणतीही लस नाही. यातच प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णासाठी आशादायी ठरत आहे. कोरोना बाधित उपचार घेवून बरा झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची चाचणी केली जाते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या गाईडलाईननुसार ही चाचणी होते. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या अंटी बॉडीज रक्तदानातून प्लाझ्मा वेगळा काढून अत्यावस्थ रुग्णाला चढवला जातो. याबाबत आयसीएमआरच्या काही कडक नियमावली आहेत, त्यांच्या अखत्यारीत राहून रुग्णालयांना थेरपी करण्याची मुभा आहे. या थेरपीमुळे रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढून तो रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते.

कोरोना बाधितांचा मुंबईतील वाढता आकडा पाहता मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालय हे कोविड स्पेशल रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात येथे कोविड-१९ रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. यात प्लाझ्मा थेरपीचा वापर सुद्धा करण्यात आला होता. आता याच रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी युनिटचे निर्माण झाल्याने मुंबईत अशाप्रकारे उपचार करणाऱ्या रुग्णालयात आता सेव्हन हिल रुग्णालयाचे नाव सुद्धा जोडले गेले आहे.

रूग्णांचे जीवन वाचवण्यासाठी मदत करावी – सचिन तेंडूलकर

“कोविड-१९’पासून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा थेरपीसाठी आपले रक्त दान करावे आणि गंभीर आजारी असलेल्या रूग्णांचे जीवन वाचवण्यासाठी मदत करावी” असे आवाहन सुद्धा यावेळी सचिन तेंडूलकर यांनी केले.

कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय आघाडीवर आहे. सरकार आणि बीएमसीच्या सक्षम सहकार्याने रुग्णालयाने या रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिली आहे. आजपर्यंत रुग्णालयात ६००० पेक्षा अधिक रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. आता नवीन प्लाझ्मा थेरपी युनिटसह, गंभीरपणे आजारी रूग्णांवर या नवीन थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

कॉन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपीचा उपयोग यापूर्वी सार्स, मार्स आणि एच 1 एन 1 (स्वाइन फ्लू) सारख्या इतर विषाणूजन्य रोगांच्या उपचारांमध्ये यशस्वीरित्या केला गेला आहे.

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

#covid19 #plasma_therapy #sevenhillhospital #sachintendulkar

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!