जेव्हीएलआरवर सॅनिटायझर टेम्पो उलटला

सॅनिटायझर कॅन घेऊन जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) वरून ठाणेकडे जाणारा टेम्पो (एमएच ०१ सीव्ही ८३०२) पवई प्लाझाजवळ उलटल्याची घटना आज, गुरुवार १६ जुलै रोजी संध्याकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास पवईत घडली. दुभाजकाला धडकल्याने टेम्पो पलटी झाल्याचे टेम्पो चालकाने सांगितले. टेम्पो चालक अब्दुल रेहमान यात बचावला आहे. मुख्य मार्गावरच टेम्पो उलटल्याने जेव्हीएलआरवर बराच काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. क्रेनने टेम्पो बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सॅनिटायझर कॅन घेवून मजीद बंदर येथून टेम्पो निघाला होता. अंधेरी येथे सामानाची डिलिव्हरी करून आपल्या शेवटच्या डिलीव्हरीसाठी हा टेम्पो जेव्हीएलआर मार्गे ठाणे येथे जात होता. पवई प्लाझा येथे मुख्य रस्त्यावरून प्रवास सुरु असताना एका कारचालकाने डावीकडे गाडी घेतल्याने त्याला बचावण्याचा प्रयत्नात मुख्य मार्ग आणि सर्विस रोड यांच्यामध्ये असणाऱ्या दुभाजकाला धडकून टेम्पो उलटल्याचे टेम्पो चालक अब्दुल रेहमान याने सांगितले. टेम्पो पलटल्याने टेम्पोतील सॅनिटायझरचे नुकसान झाले आहे.

मुख्य मार्गावरच टेम्पो पलटल्याने जेव्हीएलआरवर बराच काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पवई पोलीस आणि साकीनाका वाहतूक विभागाने सर्विस रोडवरून वाहतूक वळवत क्रेनच्या मदतीने टेम्पो बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

जेव्हीएलआरवर सॅनिटायझर टेम्पो उलटला

फोटो: जॉली मोरे

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!