आयआयटीत संरक्षक भिंत कोसळली

रविराज शिंदे

Security-wall-IITलग सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पवईतील चैतन्यनगरमध्ये गेल्या आठवड्यात दरड कोसळून २ जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, त्याच्या लगतच असणाऱ्या इंदिरानगर टेकडीवरील संरक्षक भिंत आज पहाटे (सोमवारी ) ५ वाजता कोसळली. रहदारीच्या मार्गावरच भिंत कोसळल्याने स्थानिकांना जीव मुठीत घेऊन त्यातून वाट काढावी लागत आहे. पहाटेची वेळ असताना घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी धोका मात्र कायम आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी भिंत कोसळलेल्या ठिकाणी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली आहे, तर पालिका ‘एस’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देवून लोकांच्या समस्या समजून घेतल्या.

“गेल्या वर्षभरापासून पवईतील टेकड्यावरील संरक्षक भिंतीच्या प्रश्नांचा पत्रव्यवहार करून पाठपुरावा युथ पॉवर संघटनेकडून केला जात आहे, मात्र पालिका प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यात टेकड्यांवरील भिंत कोसळण्याच्या घटना पवईत पूर्वीही घडल्या आहेत. तरीही प्रशासन या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे पवईतील टेकड्यावरील रहिवाश्यांचे जीव मात्र धोक्यात आले असल्याचे”, ‘युथ पॉवर’ संघटनेचे मुंबई अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी यावेळी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!