शिवसेना भवनातील टीम शिंदेंच्या गोटात; चांदिवली येथील कार्यक्रमात केला प्रवेश

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर भाजप सोबत एकत्रित येवून सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात राज्यभरातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरें समर्थक ठाकरे गटाच्या सभा, कार्यक्रम आणि सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना भवनातील टीमने उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. चांदिवली येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमावेळी शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला.

ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आणि सचिव अनिल देसाई यांचे विश्वासू कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या अमोल मटकर यांच्यासोबत अमित शिगवण, अविनाश मालप, प्रथमेश चाचले यांचा यात समावेश आहे.

कोण आहेत अमोल मटकर

अमोल मटकर यांची शिवसेनेचे इव्हेंट्स, सोशल मीडिया आणि डिझायनिंग टीममध्ये अत्यंत महत्वाची भूमिका होती. दसरा मेळावा, शिवसेना पक्षाचा आणि मार्मिकचा वर्धापन दिन, कार्यक्रमांच्या आयोजना वेळी मंचावरचा बॅकड्रॉपपासून संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी मटकर सांभाळत असत. पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडियावरील मिम्स, कार्ड्स, फोटोज आणि डिझायनिंगच्या कामात ते महत्वाची भूमिका बजावत होते.

२०१२च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीमधील गाजलेले स्लोगन ‘होय, करून दाखवलं ! परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात सर्व नव्या शिवशाही एसटी बसेसवरचे लोगोसुद्धा मटकर यांनीच डिझाईन केले होते.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!