आमदार फंडातून गोखलेनगर येथे १६ सिटर सार्वजनिक शौचालय

पवईतील गोखलेनगर भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना पाहता विक्रोळी विधानसभा आमदार सुनील (भाऊ) राऊत यांच्या आमदार निधीतून गोखलेनगर येथील १६ सीटच्या सार्वजनिक शौचालयाच्या नूतनीकरणाचे तसेच तरुण मित्र मंडळच्या कार्यालयाचे काम करण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक १२२ शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या प्रयत्नाने मुं. झो. सु. मं. (म्हाडा) अंतर्गत बांधण्यात आलेल्या या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण मंगळवारी पार पडले.

यावेळी आमदार सुनील राऊत यांच्यासोबत, विभाग प्रमुख धरमनाथ पंत, निलेश साळुंखे, सचिन मदने, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

पवई, आयआयटी भागात असणाऱ्या गोखलेनगर परिसरात मोठी लोकवस्ती आहे. या परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची मोडतोड आणि पडझड झाल्याने दुर्दशा झाल्यामुळे याची दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिकांच्यावतीने शाखाप्रमुख मदने यांच्याकडे करण्यात आली होती. तसेच या परिसरात बाजार भरत असल्याने येथे येणाऱ्या नागरिकांची बऱ्याचदा अडचण होत असे ज्याचा विचार करता मदने यांनी आमदार सुनील राऊत यांच्याकडे येथील शौचालयाच्या दुरुस्तीची मागणी केली होती.

“नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेत आमदारांनी त्वरित फंड मंजूर करत, स्वतः पाठपुरावा करून नागरिकांच्या सुविधेसाठी सदर शौचालयाचे नूतनीकरण करून नागरिकांच्या सोयीसाठी खुले केले आहे,” असे यासंदर्भात बोलताना मदने म्हणाले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!