साकीनाका येथे मेट्रो समोर तरुणाची आत्महत्या

छायाचित्र: माझी मेट्रो

छायाचित्र: माझी मेट्रो

बिहार येथील एका २५ वर्षीय तरुणाने साकीनाका मेट्रो स्थानकात मेट्रोसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मेट्रोच्या समोर आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे सेवा बराचकाळ विस्कळीत झाली होती. मात्र, काही तासाच्या खोळंब्यानंतर हळूहळू सेवा पूर्वपदावर आली.

बिहारच्या मधुबनी येथील उदय कुमार मिश्रा (२५) हा सकाळी ९.२० वाजता घाटकोपरकडे जाणारी मेट्रो पकडण्यासाठी साकीनाका मेट्रो स्थानक येथे उभा होता. वर्सोवा कडून घाटकोपरकडे जाणारी मेट्रो स्थानकात येत असतानाच उदयने मेट्रो समोर उडी मारून आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने तेथे उपस्थित प्रवासी आणि मेट्रो कर्मचारी कोणीही काही करू शकले नाहीत.

“रेल्वे कर्मचाऱ्यानी याबाबत साकीनाका पोलीस ठाण्याला कळवताच पोलिसांनी येऊन बॉडी शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेली. ‘त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही’ असे माध्यमांशी बोलताना साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

या घटनेमुळे मेट्रो प्रशासनाने केवळ एकाच लाईनवरून वर्सोवा ते मरोळनाका अशी सेवा सुरु ठेवल्याने पूर्ण बोजबारा उडाला होता. सुट्टीचा दिवस असल्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी नव्हती. मात्र, सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा एकीकडे मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आणि मेट्रोही रखडल्याने मोठा खोळंबा झाला होता. जवळपास दोन तासाने मेट्रो सेवा सुरळीत झाल्यावर प्रवाश्यांच्या जीवात जीव आला.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

[related_posts limit=”5

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!