Tag Archives | आयआयटी कॅम्पस

Leopard IIT Bombay_90

आयआयटी बॉम्बे परिसरात दिसला बिबट्या

संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना वन्यजीव, पक्षी हे मात्र मुक्त संचार करत आहेत. असाच संचारासाठी बाहेर पडलेला एक बिबट्या (Leopard) नुकताच आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरातील लायब्ररी जवळील झाडीत दिसून आला (spotted) आहे. याबाबत आयआयटी बॉम्बेकडून पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. हा बिबट्या येथील काही कर्मचाऱ्यांना झाडीत बसलेला दिसल्यानंतर त्यांनी फोन आणि कॅमेऱ्याने त्याचे फोटो […]

Continue Reading 0
marthon car break

मॅरेथॉन पडली महागात, चोरट्यांनी गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तू लांबवल्या

पवई आयआयटीमध्ये रविवारी पहाटे मॅरेथॉनसाठी आलेल्या लोकांच्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्या चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास ५ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. चोरट्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यानंतर महागडे मोबाईल, पाकीट तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड लंपास केले आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांना माहिती देण्यात आली असून, ते अधिक […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

आयआयटी  कॅम्पसमधून वायर चोरी करणाऱ्या टोळीसह भंगारवाल्याला अटक

आयआयटी पवई कॅम्पस भागातील सुरक्षा व्यवस्थेला भेदत, येथील तांब्याच्या वायर चोरी करणाऱ्या टोळीच्या तीन लोकांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शुक्रवारी उशिरा अटक केली आहे. या गुन्ह्यातील सगळा चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याला सुद्धा पवई पोलिसांनी अटक करत संपूर्ण चोरीचा माल हस्तगत केला आहे. राहूल नारायण तायडे (२६), संतोष बाबासाहेब गोरे (२६), विनोद राजाराम गुलगे […]

Continue Reading 0
powai-thief-broken-car-windows-and-stolen-cash-and-valuables

पवईत चोरट्यांचा सुळसुळाट; गाड्यांच्या काचा फोडून ५ लाखांची चोरी

आयआयटी पवई येथील मॅरेथॉनवेळी १२ गाड्या फोडून चोरीच्या घडलेल्या गुन्ह्याचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतानाच, पवईत पुन्हा गाडीच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या चोरीचा गुन्हा घडला आहे. हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे दोन तर नोरिटा बस स्टॉप येथे हे गुन्हे घडले आहेत. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पवई पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. पाठीमागील महिन्यात […]

Continue Reading 0
car

चोरट्यांनी आयआयटी पवईत हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या १२ लोकांच्या गाड्या फोडल्या

पवईतील आयआयटी येथे हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास १२ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. यावेळी चोरट्यांनी गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, बॅग अशा मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पवईतील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये आज (रविवारी) सकाळी हाफ मॅरेथॉन […]

Continue Reading 0
iit yuvasena

आयआयटीतील मांसाहार वाद बंद करा, युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

@अविनाश हजारे, रमेश कांबळे पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये मागील काही दिवसांपासून शाकाहारी- मांसाहारी वाद पेटलेला असतानाच युवासेनेने यात उडी घेत, संस्थेतील सर्व कँटिंगमध्ये सारखीच नियमावली लागू करावी अशी मागणी करणारे निवेदन घेवून सोमवारी आयआयटीत धडक दिली. आयआयटी मुंबईचे कुलसचिव प्रेमकुमार यांची भेट घेवून, त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन करण्याचा […]

Continue Reading 0

आयआयटी कॅम्पसमध्ये डबक्यात बुडून मुलाचा मृत्यू

आयआयटी, पवई येथील एका डबक्यात पडून एका ३ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी १०.३० वाजता आयआयटी कॅम्पसमध्ये घडली. सार्थक चंद्रकांत येवले असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत. आयआयटी तंत्रज्ञान संस्थेत काम करणारे व इंदिरानगर येथील रहिवाशी विकास कमलापुरकर हे आपला भाचा […]

Continue Reading 0
people-fighting-clip-art-578476

आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मारामारी, चौघांना अटक

मूड इंडिगोसाठी आयआयटी कॅम्पसमध्ये राजस्थानच्या कोटा भागातून आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यामध्ये प्रेमप्रकरणातून हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पवई पोलिसांनी कारवाई करत मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. उत्कर्ष शर्मा (२०), दिवांज चौधरी (२०), जुनेद खान (१९), शुभम पांडेय (१८) अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर काळात पवईतील आयआयटी मुंबई […]

Continue Reading 0
leopard-iitb

आयआयटी कॅम्पसमध्ये बिबट्या

आयआयटी कॅम्पस परिसरातून बरेच दिवस गायब झालेल्या बिबट्याचे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा कॅम्पस परिसरात दर्शन घडू लागले आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी असे अनेक लोकांना या बिबट्याने दर्शन दिले असून, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा हा बिबट्या फिरताना कैद झाला आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, बिबट्या नक्की कुठे लपून बसत आहे याची […]

Continue Reading 0
markant-lila-final

आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा

भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे. […]

Continue Reading 0
suicide

आयआयटी कॅम्पसमध्ये प्रोफेसरच्या मुलीची आत्महत्या

आयआयटी कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयात बारावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने कॅम्पसमध्येच असणाऱ्या शिवालिक इमारतीच्या १४व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे आयआयटीमध्ये प्रोफेसर असल्याचे बोलले जात आहे. सरोजा नांबियार (बदललेले अडनाव) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे. पवई पोलिसांनी याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!