पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे. पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार […]
Tag Archives | चोर
“खिसेकापू, चोरांपासून सावधान” पवई पोलिसांची पोस्टर जनजागृती
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बसमधे, ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांची पाकिटे, मोबाईल, किंमती सामान लांबवणाऱ्या टोळ्या संपूर्ण मुंबईभर धुडगूस घालत आहेत. पवई, साकीनाका भागात गेल्या महिनाभरात अशा प्रकारच्या ७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि मुंबईकरांच्यात जनजागृतीसाठी पवई पोलीस ठाण्याच्यावतीने पवईतील गर्दीच्या आणि प्रमुख बस थांब्यांवर “खिसेकापू, मोबाईल चोरांपासून सावधान” असा इशारा देणारे […]
पवईत सायकल चोराला अटक, महागड्या सायकली हस्तगत
पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात सायकल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चोराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली आहे. मोहमद आरिफ अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून जवळपास १७ महागड्या सायकली सुद्धा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पवईसह साकीनाका, मरोळ, एमआयडीसी भागात गेल्या काही महिन्यात सायकल चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला होता. […]
हिरानंदानीत घरफोडी, साडेतीन लाखाचा ऐवज साफ
हिरानंदानीतील टोरीनो इमारतीच्या एकतिसाव्या माळ्यावर राहणाऱ्या फिलिप वर्गीस यांच्या घरात प्रवेश करून, अज्ञात चोरट्याने ३.५६ लाखाच्या ऐवजावर हात साफ केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत फिलीप यांनी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. (more…)
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चांगला, टापटिपीत पेहराव करून, मोठ्या घरातील इसम असल्याचे भासवत मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र सुरावत (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे. उमा मल्होत्रा मरोळ येथील अशोक टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील घरात आपल्या परिवारासोबत राहतात. २ जानेवारीला काही कामानिमित्त त्या घराबाहेर गेल्या होत्या. परत आल्यावर […]