सकाळ, दुपार, संध्याकाळ असे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे पवईकरांच्या डोक्याचा ताप आणि हिरानंदानी पवईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बनलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील चंद्रभान शर्मा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पोद्दार शाळा प्रशासन आणि हिरानंदानी प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपुष्टात आलेला आहे. आता एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न पवईकर उपस्थितीत करत आहेत. जोगेश्वरी […]
Tag Archives | पवई प्लाझा
लेकहोममध्ये पुन्हा आग, ३ गंभीर जखमी
चांदिवली येथील लेकहोम कॉम्प्लेक्समधील लेक फ्लोरेन्स इमारतीच्या ‘बी’ विंगमधील १३व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज (मंगळवार) संध्याकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या साहय्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीची माहिती मिळाल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाल्याने घसरून पडून आणि धूर शरीरात गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ११ जणांना हिरानंदानी रुग्णालयात […]
पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड
साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]
बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम
एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]
वाहतूक कोंडीतून सुटका: हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटवर ‘नो पार्किंग’
@प्रमोद चव्हाण वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात पवई दुसऱ्या स्थानावर असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र आता यातील वाहतूक कोंडी या समस्येतून तरी हिरानंदानी लवकरच सुटणार आहे. येथील सेन्ट्रल एव्हेन्यू रोड आणि मेन स्ट्रीटला “नो पार्किंग झोन”घोषित करण्यात आले आहे. तसे संदेश देणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले असून, […]
पवई प्लाझामध्ये भीषण आग; ऑफिस जळून खाक
हिरानंदानी येथील पवई प्लाझाच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिओ सिंडीकेट या कन्सल्टन्सी ऑफिसला आज (सोमवार) सकाळी ११.३० वाजता भीषण आग लागली. आगीत कन्सल्टन्सी ऑफिस जळून पूर्ण खाक झाले असून, शेजारी असणाऱ्या दोन ऑफिसना सुद्धा याची झळ बसली आहे. इमारत प्रशासन, शॉप कर्मचाऱ्यांच्या मदतीने व घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमनदलाच्या ५ गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या […]