Tag Archives | पॉज मुंबई

dear

डोंगरावरून पडून पवईत चितळाचा मृत्यू

पवई परिसरातील डोंगराळ भागात आज २२ एप्रिल २०२० एक चितळ मृतावस्थेत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आयआयटी पवईला लागून असणाऱ्या फुलेनगर जवळील डोंगर भागातील महाकाली मंदिरापाठीमागे हे चितळ मृतावस्थेत मिळून आले. चितळाची वैद्यकीय तपासणी केली असता उंचावरून पडून चितळाचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी […]

Continue Reading 0
magar (crocodile) bhandup paws mumbai

सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान

संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती. पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना […]

Continue Reading 0
PAWS

पॉज मुंबईतर्फे प्राणीमित्रांचा सन्मान

मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था प्लांट अँड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) आणि अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) यांच्यातर्फे वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्यूरो (डब्ल्यूसीसीबी) पश्चिम विभागाचे उपसंचालक एम मारंको, डब्ल्यूसीसीबी कॉन्स्टेबल सप्पन मोहन आणि प्राणीमित्र रूपा अंबर्ले यांना त्यांच्या कार्याबद्दल कौतुक प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. औचित्य होते ते पशु कल्याण पंधरवडा २०२० कार्यक्रमाचे. पॉज मुंबई आणि एसीएफतर्फे […]

Continue Reading 0
pl led

पवई तलाव परिसर उजळणार एलईडी दिव्यांनी; पर्यावरणवादी संस्थांची सौर एलईडी दिव्यांची मागणी

विदेशी पर्यटकांसह मुंबईकरांचे आकर्षण असलेला पवई तलाव परिसर येत्या काही दिवसात एलईडी दिव्याने उजळणार आहे. पवई तलाव सुशोभिकरणाच्या वेळी हे एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. या कामासाठी ७.५ कोटी खर्च येणार असून, दोन कंत्राटदारांची निवड सुद्धा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपल्या कॅमेऱ्यात येथील दृश्यांना कैद करण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र, पर्यावरणवादी संस्था पॉज […]

Continue Reading 1
DSCN0221

पवई तलावाला मगर पार्क घोषित करा – पॉज मुंबई

पवई तलावात सोडले जाणाऱ्या दुषित, घाण पाण्यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. जे पाहता प्लॅंट एंड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) मुंबईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री (वन आणि पर्यावरण) प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे पवई तलावाला ‘मगर पार्क’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सोबतच तलाव भागात परवाना आणि विनापरवाना दोन्ही प्रकारे चालणारी मच्छिमारी रोखण्याची मागणी सुद्धा […]

Continue Reading 0
RTE - Random Shot - Croc sun bathing in Powai Lake opp Transocean bust stop

शुक्रवारी व शनिवारी पवई तलावावर मगर दर्शन

पवई तलाव भागात मॉर्निंग वॉकला येणारे, सकाळी कामावर जाणारे आणि पर्यटक अशा सर्वांना पवई तलावाच्या भागात जवळपास ८ फुटी मगरीचे दर्शन घडल्याने, शुक्रवारची सकाळ ही पवईकर आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मगर दर्शन घडवणारी सकाळ ठरली. काही वेळाने तलावातील गाळ काढण्याचे काम करणारे यंत्र जवळ येताच मात्र ही मगर पुन्हा पाण्यात परतल्याने, याची खबर लागल्यावर उशिरा […]

Continue Reading 0
ajgar

पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य

पवई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!