Tag Archives | पोलीस

nsg cmnd house theft

पवईत चोरट्यांनी फोडले दारूचे दुकान, ८.५ लाखाची दारू आणि रोकड लंपास

सोमवारी राज्य सरकारच्या परवानगीनंतर पवईतील एक दारूचे दुकान उघडले असता दुकानात ८.५ लाखाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. मालकाने दुकान उघडले असता दुकानातील ७.५ लाख किंमतीच्या दारूच्या बाटल्या आणि १.१० लाखाची रोकड चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. पवई पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर […]

Continue Reading 0
WhatsApp Image 2020-04-14 at 12.58.42 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त चेतनने साकारले पोर्ट्रेट

बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

Continue Reading 0
Chetan police art

पोलिसांना चेतनची आपल्या कलेतून मानवंदना

@सुषमा चव्हाण | देशावर, समाजावर येणाऱ्या प्रत्येक संकटाच्या वेळी त्या संकटाशी निधड्या छातीने सामना करायला देशांचे सैन्य आणि पोलीस सदैव तत्पर असतात. सध्या देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या या वीरांना पवईकर मोझेक आर्टिस्ट चेतन राऊत याने मास्क धारक पोलीस कर्मचाऱ्याचे पोर्ट्रेट […]

Continue Reading 0
house breaking

नेपाळी सुरक्षारक्षकांच्या टोळीची पवईत ५६ लाखाची चोरी

इमारतीच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या नेपाळी सुरक्षारक्षकांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून फ्लॅटमध्ये घुसून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत ५६ लाखाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी पवई परिसरात घडला आहे. घरातील मंडळी सुट्टीसाठी परदेशी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी आपला डाव साधला आहे. याप्रकरणात पवई पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करून सुरक्षारक्षकांचा शोध सुरु केला आहे. कुर्ला […]

Continue Reading 0
phishing

ऑनलाईन दारु मागविणे पवईकराला पडले महागात

घरातील पार्टीसाठी दारु मागविण्यासाठी वाईन्स शॉपचा नंबर ऑनलाईन शोधणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. दारु पाठविण्याच्या बहाण्याने ठगाने एका पायलट तरुणाच्या खात्यातील ३८ हजाराच्या रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करुन पवई पोलीस तपास करत आहेत. पवईतील हिरानंदानी गार्डनमध्ये आपल्या कुटूंबासोबत राहत असलेला ३२ वर्षीय तरुण एअर इंडियामध्ये पायलट आहे. […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

इराणी टोळीच्या सदस्याला आंबिवलीतून अटक; साकीनाका, पवई पोलिसांची संयुक्त कारवाई

पवई, साकीनाका भागात सीबीआय ऑफिसर आणि पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या इराणी टोळीच्या एका सदस्याला कल्याणमधील आंबिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. जाफर अली असिफ अली सय्यद (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साकीनाका आणि पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. आम्ही […]

Continue Reading 0
court-1234

केटामाईन तस्करी प्रकरण: ७ आरोपी दोषी, पवईतील दोन आरोपींचा समावेश

केटामाईनच्या तस्करी प्रकरणी जळगाव जिल्हा तसेच सत्र न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी ठरविले आहे. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींमध्ये २ पवईतील आहेत तर १ विक्रोळी भागातील. ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाठीमागील ५ वर्षांपासून जळगाव न्यायालयात हा खटला सुरू होता. दोषी आरोपींना २२ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. […]

Continue Reading 0
ismail shekh - sakinaka house breaking

घरफोडी करून लाखो रुपये घेवून पळून गेलेल्या सराईत चोरट्याला ७२ तासाच्या आत साकीनाका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

साकीनाका ९० फीट रोड येथील सेठीया नगरच्या एका घरातून २० मार्चला ९ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेवून पसार झालेल्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी ७२ तासाच्या आत वाराणसी, उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. इस्माईल इसाक शेख (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत अशोक भानुशाली यांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या उपचारासाठी जमा केलेली रक्कम […]

Continue Reading 0
arrested accuse in MP case

अनैतिक संबंधातून ५ वर्षाच्या मुलाची हत्या करून मध्यप्रदेशातून पळून आलेल्या आरोपीला पवई पोलिसांनी घातल्या बेड्या

अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून प्रेमिकेच्या पाच वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या करुन, मध्यप्रदेशातून पळून आलेल्या आरोपीस पवई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या बळावर अटक केली आहे. संजीव पांडे (वय ३६ वर्ष, रा. जिल्हा रिवा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी त्याला अटक करून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पांडे याचे आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका […]

Continue Reading 0
fraud

पर्यटनासाठी निघालेल्या लोकांची २.३५ लाखांची फसवणूक

कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत पर्यटनासाठी निघालेल्या साकीनाका येथील काही जणांना आकर्षक टूर पॅकेजच्या बहाण्याने २ लाख ३५ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. साकीनाका पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका, काजूपाडा येथे राहणारे आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करणारे सदादूर पाल आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत मसुरी, नैनिताल या ठिकाणी फिरण्यासाठी निघाले होते. यासाठी […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

संपत्तीसाठी मृत आईला केले जिवंत; तिघांना अटक

वडिलोपार्जित संपत्तीत वारसा हक्काने मुलांनाच अधिकार मिळतो. मात्र ही संपत्ती आपल्याला एकट्याला मिळावी म्हणून कधी कधी असे डाव आखले जातात की मृत व्यक्तींना सुद्धा कागदोपत्री जिवंत केले जाते. असाच एक डाव आखून आपली आई जिवंत असल्याचे भासवून, २८५ करोडच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, मेणबत्ती उत्पादन करणाऱ्या कंपनीचे संचालक असणाऱ्या व्यावसायिक सुनील गुप्ता, त्याची पत्नी […]

Continue Reading 0
ganesh katte

पोलिस शिपायाने कर्तव्यावर असताना रक्तदान करुन जपली सामाजिक बांधिलकी

प्रमोद चव्हाण, रमेश कांबळे एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई गणेश कट्टे यांनी रुग्णालयात जावून रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपत एक उदाहरण जगासमोर निर्माण केले आहे. आयआयटी पवई येथील झुरी कंपाऊंड भागात राहणारे निलेश नागे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या […]

Continue Reading 24
IMG_8192

साकीनाका पोलीसांची गुन्हेगारी रोखण्यासाठी भित्तीचित्राद्वारे जनजागृती

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्याचे प्रकार बघूनच अनेक गुन्हेगार गुन्हे करत असतात. साकीनाका पोलिसांनी यावरच एक युक्ती लढवत चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या “व्हिलन”ची भित्तीचित्रे बनवून त्यांच्या आधारे संदेश देताना अधिक मनोरंजक करण्यासाठी त्यांचे प्रसिद्ध संवाद वापरून परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीची शक्कल लढवली आहे. साकीनाका पोलिस स्टेशनच्या भिंतीवर चित्रपटातील नामांकित व्हीलनस गुन्हेगारी वाईट आहे, कायदा सुव्यवस्था आणि […]

Continue Reading 0

पोलीस शिपायाने सिमेंट मिक्सरमध्ये अडकलेल्या तरुणाला दिले जीवनदान

साकीनाका पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई वैजनाथ कांबळे यांनी सिमेंट मिक्सरमध्ये अडकून पडलेल्या लालबहादूर (३५) या तरुणाला धाडसाने वाचवून जीवनदान देत मुंबई पोलिसांच्या शौर्याची प्रचिती दिली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याशी जोडल्या गेलेल्या शिपायांच्या धाडसाची ही दुसरी कहाणी आहे. या पूर्वीही अजून एक पोलीस शिपायाने आत्महत्येसाठी डोंगरावर चढलेल्या तरुणाचा जीव वाचवण्याचे धाडसी कृत्य केले होते. बुधवारी नेहमी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!