चांदीवली येथील लेकहोम जवळ एका डिलिव्हरी बॉयला डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. डिलिव्हरी बॉय सकाळी कामावर हजर होत असताना मोटारसायकल घसरल्याने डंपरखाली आल्याने ही घटना घडली. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत डंपर चालक मोहम्मद आरिफ मोहंम्मद याकूब शहा (३४) याला अटक केली आहे. चांदीवली येथील संघर्षनगर भागात राहणारे आणि डिलिव्हरी बॉय म्हणून […]
Tag Archives | लेकहोम
विकृत मानसिकता: एअरगनच्या साहय्याने घेतला श्वानाचा जीव; लेक होममधील घटना
पवईतील लेक होम येथील लेक फ्लोरेंस इमारतीत एका श्वानाला (कुत्रा) एअर गनच्या साहय्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. श्वानाच्या शरीरात एक्सरेमध्ये दोन एअर गनच्या पुलेट्स डॉक्टरांना मिळून आल्यानंतर ही घटना समोर आली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार […]
चांदिवलीत मिनी अग्निशमन केंद्र सज्ज
चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसरात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी चांदिवली येथे नुकतेच मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. अग्निशमन […]
पवईत पावसाने दाणादाण
झाडे पडली, कंटेनर घसरून अडकून पडल्याने वाहतूक कोंडी, इमारतीत पाणी घुसले, नाले भरून वाहू लागले @प्रमोद चव्हाण मुंबईत शुक्रवारी रात्री पासूनच पावसाचे जोरदार आगमन झाले. शनिवार दिवसभर थोड्या थोड्या कालावधीत बरसत राहिल्याने मुंबापुरी तुंबल्याची चित्रे पहायला मिळत होती. पवई सुद्धा यातून वाचली नाही. पावसाच्या पहिल्या तडाख्यात पवईत अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कंटेनर घसरून […]
चांदिवलीत लवकरच बनणार विस्तारित अग्निशमन केंद्र
@अविनाश हजारे, @सुषमा चव्हाण चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसराचा होणारा विस्तार आणि घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी लवकरच चांदिवली येथे मरोळ अग्निशमन केंद्राचे विस्तारीत अग्निशमन केंद्र उभे करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात आमदार नसीम खान यांच्यासह मुंबई अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी एस. के. बांगर, एच. आर. शेट्टी तसेच महानगरपालिका ‘एल’ ईमारत विभागाचे श्री. पगारे […]
लेक होममध्ये बाहेरील वाहनांना ‘प्रवेश बंद’
@pracha2005 लेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी येथील स्थानिकां व्यतिरिक्त बाहेरील वाहनांना आता कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबत तिन्ही कॉम्प्लेक्सच्या फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, १५ सप्टेंबर पासून यांची संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्या पूर्व सुचणेसाठी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी ‘Please leave our road alone’ […]