On 27th June Helping Hands for Humanity (HHH) – a non-profit organisation in collaboration with Burns and McDonnell, a renowned engineering and design firm installed a magnificent peacock sculpture at Powai Nisarg Udyan, a public green space. The sculpture serves as a symbol of environmental consciousness, highlighting the importance of preserving native wildlife and ecosystems. […]
Tag Archives | Brihanmumbai Municipal Corporation
पवई तलाव सांडपाणीमुक्त करण्यासाठी पालिकेतर्फे सल्लागाराची निवड
पवई तलावात सोडले जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) अखेर सल्लागार सापडला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी टंडन अर्बन सोल्युशन्स या सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला पाठीमागील आठवड्यात मंजुरी दिली आहे. कंपनी येत्या ६ महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यानंतर सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. कंपनीशी सल्लामसलत करण्यासाठी पालिका ६७.८० लाख […]
पवईमध्ये बोगद्यात वर्षभरापासून अडकून पडलेली टीबीएम मशीन काढणार कशी? तज्ञांना पडला प्रश्न
पाणी चोरी रोखणे आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळावा म्हणून मुंबईचे जुने पुरवठा नेटवर्क सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका वेरावली ते घाटकोपर ६.६ किमी लांबीचे पाणीपुरवठा बोगदा तयार करीत आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी वेरावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी बोगदा खोदणारी मशीन (टीबीएम) पवईजवळ बोगद्यात वर्षभरापासून अडकली आहे. वर्षभरात या मशीनला काढण्यात अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र […]
सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान
संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती. पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना […]
मेट्रो-६ भूमिगत करण्याच्या समर्थनात पवईत सह्यांची मोहीम
आज, रविवार (२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत चांदिवली डी-मार्टजवळ भूमिगत मेट्रो-६ समर्थनात सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. पवईतील विविध भागात भूमिगत मेट्रो -६ च्या समर्थनात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. आज रविवार (२ फेब्रुवारी) चांदिवली डी-मार्टजवळ आणि रहेजा विहार येथे ही मोहिम राबवली जाणार आहे. संध्याकाळी ४.३० ते ६.३० यावेळेत भूमिगत मेट्रोच्या मागणीच्या […]
मेट्रो – ६ भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करावी: पवईकरांची मागणी
मुख्यमंत्र्यांनी आरे कार शेड प्रकरणात सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असल्याने आम्हाला आशा आहे की ते आमच्या भूमिगत मेट्रोच्या मागणीकडे सुद्धा लक्ष देतील. – पवईकर @प्रमोद चव्हाण मेट्रो – ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी पवईकरांनी केली आहे. सोमवारी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिगत मेट्रोच्या मागणी आणि भेटी संदर्भातले पत्र सादर केले. […]
संघर्षनगर येथील रुग्णालयाच्या जागेची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी
शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे यांच्या प्रयत्नांतून चांदिवली, संघर्षनगर येथे बनवण्यात येणार असलेल्या पालिका रुग्णालयाच्या जागेची मुंबई महानगर पालिका आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. मनपा आरोग्य विभाग सहयुक्त सुनील धामणे यांच्यासह आरोग्य विभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघर्षनगर येथील यासाठी नियोजित जागेची पहाणी केली. यावेळी स्थानिक आमदार दिलीपमामा लांडे, माजी नगरसेवक ईश्वरजी तायडे, […]
चांदीवलीत लवकरच उभे राहणार २५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय
स्थानिक शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून लवकरच चांदिवलीत ७ मजली सुसज्ज रुग्णालय पालिकेच्या माध्यमातून उभे राहणार आहे. मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह आयुक्त सुनील धामणे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर धामणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाच्या कामासाठी हिरवा कंदील दिला आहे. चांदीवली विधानसभा क्षेत्रातील लाखो नागरिकांना महानगरपालिकेची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना आमदार दिलीप […]
भूमिगत मेट्रोच्या मागणीसाठी मुंबईकरांची पवई तलावावर मानवी साखळी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारद्वारे सुरू केलेल्या अनेक पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेत निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक प्रकल्पांना लाल झेंडा दाखवलेला असतानाच मुंबईकरांनी उपनगरामधील भूमिगत मेट्रो कॉरिडोरच्या आपल्या मागणीवर जोर दिला आहे. याच मागणीसाठी शनिवारी (०८ डिसेंबर) मुंबईकरांकडून पवई तलाव भागात मानवी साखळी तयार करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी ४.३० ते ६.३० […]
पवई तलावाचा जलक्रीडा प्रस्ताव गुंडाळला
या तलावात निर्माण झालेल्या प्रदूषणापासून तलावाला वाचवण्यासाठी, पुनर्विकास करण्यासाठी आणि त्यास संरक्षित करण्यासाठी अनेक योजनांवर काम केले जात आहे. तलावात समृद्ध जैव विविधता आणि मगरीच्या दुर्मिळ प्रजाती आहेत. पवई तलाव भागाचे सुशोभिकरण केल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. पवई तलावात स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सारख्या जलक्रीडा सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसा ठरावही […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागातील डेब्रिज उचलली
आवर्तन पवई आणि पवईकरांच्या परिश्रमाला यश मिळाले असून, पवई तलाव भागात टाकला जाणारी डेब्रिज उचलण्यास सुरुवात झाली आहे. आवर्तन पवई सह पवईकर मुक्ताराम कांबळे, डीपीके उदास यांनी पालिकेला लेखी तक्रार करत याकडे लक्ष वेधले होते. अनेक पवईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना यश आले असून, फुटपाथ आणि चालण्यासाठी असणाऱ्या मार्गावरील […]
आवर्तन पवई इम्पॅक्ट: पवई तलाव भागात डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात पालिका दाखल करणार फौजदारी गुन्हा
पाठीमागील काही दिवसांपासून पवई तलाव भागात अज्ञान व्यक्तींकडून बांधकाम आणि खोदकामाची डेब्रिज (मलबा) टाकला जात असून, यामुळे पवई तलावाचे भवितव्य धोक्यात येत आहे. या परिस्थितीला घेवून “आवर्तन पवई”ने ३० मे रोजी पवई तलाव भागाचा झाला “उकिरडा”, परिसरात टाकला जातोय मलबा या मथळ्याखाली बातमी करत पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिकेने […]
मेट्रो – ६ प्रकल्पामुळे पवई तलावाचे ‘मगर उद्यान’ गुंडाळले
मुंबईतील पहिलेवहिले मगर उद्यान पवई तलावात बनवण्याचे महापालिकेचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे. मेट्रो सहा प्रकल्पा अंतर्गत लोखंडवाला-जोगेश्वरी-पवई-विक्रोळी-कांजुरमार्ग असा मेट्रो सहाचा कॉरीडोर निश्चित केला आहे. या मेट्रो-सहा प्रकल्पाच्या कामात पवईमधील पवई तलाव परिसरातील काही भाग बाधित होणार असल्याकारणाने प्रस्तावित मगर उद्यानाचा विचार मेट्रो पूर्ण झाल्यानंतर केला जाणार आहे. २०० हेक्टर जागेत निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या या […]
मेट्रो प्रकल्पामुळे पवई तलावाचे ‘मगर उद्यान’ लांबणीवर
मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात महापालिकेतर्फे बनवण्यात येणारे ‘मगर उद्यान’ मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनामुळे तूर्तास लांबणीवर पडले आहे. पवई तलावाजवळून मेट्रोचा ट्रॅक जाणार असल्याने प्रस्तावित मगरीचे उद्यान तूर्तास लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदांना सुद्धा पालिकेने स्थगिती दिली आहे. पवई तलावात गेल्या काही वर्षात प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. आसपासच्या निवासी संकुलांमधील घाण सांडपाणी […]