पवईतील कोरोना (कोविड १९) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज, २१ एप्रिल २०२० आयआयटी पवई येथील गोखलेनगर परिसरातील ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल (रिपोर्ट) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच पवईतील कोरोना बाधितांची संख्या आता १२ वर पोहचली आहे. ४ दिवसात ५ कोरोना बाधितांची यात भर पडली आहे. “चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये हा कोरोना बाधित मिळून आला आहे. तो […]
Tag Archives | corona virus outbreak
धक्कादायक: मुंबईतील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह; पवईतील एका पत्रकारालाही लागण
मुंबईकरांसह डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनंतर आता ऑनफिल्ड राहून मुंबईकरांना कोरोनाची अपडेट देणारे मुंबईतील ५३ पत्रकार सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांचा यात समावेश आहे. या ५३ लोकांमध्ये पवईतील एका फोटोग्राफरचा सुद्धा समावेश आहे. १६ एप्रिलला मुंबई पत्रकार संघाने महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यातून मुंबईतील […]
पवईत १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण
मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पवईतील १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाकडून शनिवारी, १८ एप्रिलला रात्री उशिरा देण्यात आली. काही दिवसांपासून रुग्णालयात ही तरुणी उपचार घेत आहे. या बाधित रुग्णामुळे पवई पोलिसांच्या हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे, तर पवईतील कोरोना बाधितांची संख्या ९ वर पोहचली आहे. […]
पवई पोलिसांच्या हद्दीत दोन कोरोना बाधीत रुग्णांची भर
राज्यात १७ एप्रिल २०२० रोजी ११८ नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, एकूण बाधितांची संख्या ३३२० झाली आहे. यात दोन रुग्णांची भर ही पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या मिलिंदनगर आणि अशोकनगर भागातून झाली आहे. या आकड्यांसोबतच पवई पोलीस ठाणे हद्दीतील रुग्णांची संख्या ९ वर पोहचली आहे. ९ पैकी २ रुग्ण मरोळकडील भागातील तर ७ रुग्ण […]
कोरोना मुक्त झाल्यानंतर चाळकऱ्यानी केलेल्या स्वागताने वृद्ध दांम्पत्याचे अश्रूं अनावर
कोव्हीड १९ आजारावर उपचार घेतल्यावर कोरोना मुक्त झालेले वृद्ध दाम्पत्य पवईतील आपल्या राहत्या घरी, चाळ सदृश्य वसाहतीत परतल्यानंतर येथील नागरिकांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत केले. चाळकरयांच्या या स्वागताने भारावलेल्या या वृद्ध दांम्पत्यास यावेळी आपले अश्रू अनावर झाले. चाळीतील सदस्यांनी आपल्या दारात आणि बाल्कनीत उभे राहत टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अशा कृतीमुळे समाजातही सकारात्मक संदेश […]
पवईत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या सहावर
पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात सुद्धा एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आला असल्याने आता पवई पोलिसांच्या हद्दीतील रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. पैकी २ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर ५ रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यातील एकाचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पवईतील कोरोना (कोविड १९) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पवईतील चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये गुरुवार, […]
पवईत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पवईतील कोरोना बाधितांची संख्या पाचवर
मुंबईत दिवसेंदिवस कोविड – १९ रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच पवईतील चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये आज, ०८ एप्रिल २०२० रोजी अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. एकाच कुटुंबातील हे दोघे असून, यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना या आजाराने ग्रासल्याची शक्यता आहे. पवईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता ५ झाली आहे. पालिकेने आसपासचा परिसर सील […]
राज्यात ८६८ कोरोना बाधित; ७० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना बाधित रुग्णांची ०६ एप्रिल २०२०ची अपडेट राज्यात आज १२० नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. यात मुंबई ५२६, पुणे (शहर व ग्रामीण) १४१, सांगली २५, ठाणे परिसर ८५, नागपूर १७, अहमदनगर २३, यवतमाळ ०४, उस्मानाबाद ०३, लातूर ०८, औरंगाबाद १०, बुलढाणा आणि सातारा प्रत्येकी ०५, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिक प्रत्येकी ०२, तर सिंधुदुर्ग, गोंदिया, […]
पवई पोलिसांनी केलं असंही संरक्षण; पोलीस कर्मचाऱ्यांचे रक्तदान
@प्रमोद चव्हाण | कोविड – १९ रुग्णांचा महाराष्ट्रातील वाढता आकडा पाहता आणि पुढील काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याला पाहता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दिवसरात्र खाकीच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षा पुरवणाऱ्या आणि कायदा – सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत विजय घागरे, अंबादास काळेल, शिवराज कोळी यांनी […]
पवईकरांनो घरीच राहा – श्रीनिवास त्रिपाठी, नामनिर्देशित नगरसेवक
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
पवईत हायजेनिक रक्तदान शिबीर
@रविराज शिंदे, रमेश कांबळे: देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढा लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवई बीजेपी वॉर्ड १२२ तर्फे आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये […]