पवईत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पवईतील कोरोना बाधितांची संख्या पाचवर

पवईत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पवईतील कोरोना बाधितांची संख्या पाचवर

मुंबईत दिवसेंदिवस कोविड – १९ रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच पवईतील चाळसदृश्य लोकवसाहतीमध्ये आज, ०८ एप्रिल २०२० रोजी अजून दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. एकाच कुटुंबातील हे दोघे असून, यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना या आजाराने ग्रासल्याची शक्यता आहे. पवईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता ५ झाली आहे. पालिकेने आसपासचा परिसर सील केला असून, नागरिकांची वर्दळ रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आयआयटी येथील चाळ सदृश्य भागात पाठीमागील आठवड्यात एक ३४ वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह मिळून आला होता. यानंतर तो राहत असलेल्या रहिवाशी सोसायटीला सील करत अलगीकरण करण्यात आले होते. ‘येथील नागरिकांची वैद्यकीय चाचणी सुरु असून, पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाच्या परिवारासह त्याच्या संपर्कात असणाऱ्या लोकांचे स्वाब घेण्यात आले होते.

“मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दोघांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट समोर येताच संपूर्ण परिसर सील करत दोघांनाही रुग्णालयात हलवण्यात आले आहे,” असे याबाबत बोलताना पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पवईत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; पवईतील कोरोना बाधितांची संख्या पाचवर

समुदाय संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. परिस्थितीची दखल घेतली गेली आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही. रहिवाशांना विनंती आहे की, “लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घरीच रहावे. अत्यावश्यक सर्व सेवा तुम्हाला घरापर्यंत पोहचवल्या जात आहेत, असेही एका पालिका अधिकाऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.

या घटनेला दुजोरा देतानाच सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) साकीनाका विभाग मिलिंद खेतले यांनी सांगितले की, “महानगरपालिकेने परिसराच्या भोवतालची जागा सील केली आहे. या परिसरात येण्या-जाण्यावर कठोरपणे प्रतिबंध केला गेला आहे. खबरदारी म्हणून पोलीस पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.”

काही मुख्य माध्यमांनी गोखलेनगर आणि रमाबाईनगर हा परिसर सील केल्याच्या बातम्या दाखवल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात केवळ बाधित रुग्ण सापडलेल्या परिसरालाच सील करण्यात आले आहे. त्यात या दोन्ही परिसरांचा समावेश नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र नागरिकांनी घरातच रहावे असे आवाहन पवई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

English Summary

Powai witnessed two more positive cases of COVID-19 today

Powai witnessed two more positive cases of COVID-19 today morning. This puts the number of Coronavirus cases in Powai at five. BMC officials received information about two positive coronavirus cases in a slum area near IIT, Powai and promptly contained the area. The two patients are a married couple and came across the deadly virus from another resident who had contracted corona earlier this week. The couple had been tested for COVID-19 three days ago with their results coming back as positive today. This led to the BMC to rush to the spot, take the patients to a designated corona hospital and cordon off the area with the help of Powai Police.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!